सार्वजनिक दहीहंडी उत्सवानिमित्त होणारी जीवघेणी स्पर्धा टाळण्याचा एक उपाय म्हणून मुंबई-ठाण्यातील समस्त गोविंदा पथकांनी आयोजकांकडून देण्यात येणारी रोख रकमेची पारितोषिके, मौल्यवान दागिने आणि गाडय़ांची बक्षिसे घेऊ नयेत, असे आवाहन समन्वय समितीने केले असले तरी ठाण्यात मात्र लाखो रुपयांच्या बक्षिसांचा दौलतजादा यंदाही कायम राहणार आहे. वैद्यकीय मंत्री असणाऱ्या जीतेंद्र आव्हाड यांनी त्यांच्या संघर्ष संस्थेच्या वतीने पाचपाखाडी विभागात आयोजित दहीहंडी उत्सवात दहा थर लावणाऱ्या गोविंदा पथकास २५ लाख, तर नऊ थर लावणाऱ्यास २० लाख रुपयांचे पारितोषिक जाहीर केले आहे.
दहीकाला!
गोविंदा रे गोपाळा
सात थर लावणाऱ्या महिलांच्या पथकासही सात लाख रुपये दिले जाणार आहेत. डीजेंच्या कर्णकर्कश आवाजामुळे होणारे ध्वनिप्रदूषण, रस्त्यावर होणारी वाहतूक कोंडी आणि अधिक उंचीचे थर लावताना होणारे गोविंदाचे जीवघेणे अपघात टाळण्यासाठी संवेदनशील नागरिक, स्वयंसेवी संस्था, महापालिका प्रशासन आणि पोलीस करीत असलेल्या प्रयत्नांना एक प्रकारे आव्हान देण्याचीच भूमिका राजकीय नेत्यांनी घेतली आहे. असे असले तरी सार्वजनिक ठिकाणी उत्सव साजरे करताना सर्वोच्च न्यायालयाने आखून दिलेल्या आवाजाच्या मर्यादांचे पालन करण्यात येईल, असा दावा जीतेंद्र आव्हाड यांनी केला आहे.
दहीहंडी फोडल्यानंतर रोख रक्कम, सोन्याची नाणी घेऊ नका!
ठाण्यात मात्र दहा थरांसाठी २५ लाखांचे आमिष
सार्वजनिक दहीहंडी उत्सवानिमित्त होणारी जीवघेणी स्पर्धा टाळण्याचा एक उपाय म्हणून मुंबई-ठाण्यातील समस्त गोविंदा पथकांनी आयोजकांकडून देण्यात येणारी रोख रकमेची पारितोषिके, मौल्यवान दागिने आणि गाडय़ांची बक्षिसे घेऊ नयेत
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Already have an account? Sign in
First published on: 17-08-2014 at 04:53 IST
Mumbai News (मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Thane dahi handi festival of 25 layer