ठाणे येथील जांभळीनाका परिसरातील जीवन ज्योती या दुकानापाठोपाठ महापालिकेच्या पथकाने गुरूवारी स्थानिक संस्था कर न भरणाऱ्या आणखी दोन दुकानांवर धाडी टाकल्या. पण, या व्यापाऱ्यांनी नेमका किती कर बुडविला, याविषयी रात्री उशीरापर्यंत माहिती मिळू शकली नाही.
ठाणे महापालिकेने स्थानिक संस्था कर भरण्यासंबंधी व्यापाऱ्यांना नोटीसा बजावल्या होत्या. पण, काही व्यापाऱ्यांनी त्यास केराची टोपली दाखविल्याने महापालिकेने कारवाईचा बडगा उगारला आहे. बुधवारी जांभळीनाका परिसरातील जीवन ज्योती दुकानावर महापालिकेच्या पथकाने धाड टाकली होती. त्या पाठोपाठ गुरूवारी त्रिमुर्ती वाईन्स आणि हस्तकला या दुकानांवर पथकाने धाडी टाकली.
महापालिका आयुक्त असीम गुप्ता यांच्या आदेशाने ही कारवाई करण्यात आली असून एलबीटी उपायुक्त दिलीप ढोले यांच्या मार्गदर्शनाखाली नऊ सहाय्यक आयुक्त यांच्या उपस्थितीत ही कारवाई करण्यात आली.
संग्रहित लेख, दिनांक 11th Oct 2013 रोजी प्रकाशित
ठाणे महापालिकेची दोन दुकानांवर धाड
ठाणे येथील जांभळीनाका परिसरातील जीवन ज्योती या दुकानापाठोपाठ महापालिकेच्या पथकाने गुरूवारी स्थानिक संस्था कर न भरणाऱ्या आणखी दोन दुकानांवर धाडी टाकल्या.
First published on: 11-10-2013 at 12:09 IST
Mumbai News (मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Thane municipal corporation raid on local body tax defaulter