मुसळधार पावसामुळे सोमवारी पहाटे वांगणी येथील नागपुरे कंपाऊंडमधील घराची िभत कोसळून झालेल्या अपघातात दोन महिलांचा मृत्यू झाला़  तसेच अन्य पाच जण गंभीर जखमी झाले आहेत़ या कंपाऊंडमध्ये चाळवजा घर असून तेथे शिर्डी येथील सहा जण भाडय़ाने राहात होते. पहाटे तीनच्या सुमारास या घराचा पाया खचून ही घटना घडली.
शांताबाई सोनावणे (६५) आणि म्हाळसा हातागळे (२८) अशी दुर्घटनेतील मृतांची नावे आहेत. तर युवराज सोनावणे (२९), रविना सोनावणे (२६), गणपत संजू सकट (९), संतोष संजू सकट (१९) आणि स्वाती हातागळे (२) अशी जखमींची नावे असून त्यांना उल्हासनगर मध्यवर्ती रुग्णालयात तसेच परिसरातील ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip

कीर्तीचा मृतदेह सापडला
ठाणे : येऊरच्या जंगलातील ओढय़ात रविवारी वाहून गेलेल्या कीर्तीचा मृतदेह सोमवारी सायंकाळी स्थानिक रहिवाशांना सापडला असून या घटनेप्रकरणी वर्तकनगर पोलिसांनी गुन्हा दाखल करण्याच्या हालचाली सुरू केल्या आहेत़  त्यामुळे संबंधित शिक्षकांचे धाबे दणाणले आहेत.  
ठाण्यातील संभाजीनगरमधील खासगी शिकवणीत शिकणाऱ्या ३३ विद्यार्थी व तीन शिक्षक येऊरच्या जंगलात पावसाळी सहलीला गेले होते. रामंदिर जवळील ओढय़ात हे सर्व डुंबण्याचा व पावसाचा आनंद घेत असताना अचानक किर्ती वाहून गेल्याचे सोबतच्या विद्यार्थ्यांच्या लक्षात आले होत़े