ठाणे येथील मनोरमानगर भागात चार दिवसांपूर्वी एका घरामध्ये जबरदस्तीने शिरून घरमालकाने भाडेकरूदेखतच त्याच्या पत्नीचा विनयभंग केल्याचा प्रकार घडला. तसेच त्याने भाडेकरू आणि त्याच्या पत्नीलाही बेदम मारहाण करून शिवीगाळ केली. या प्रकरणी कापूरबावडी पोलिसांनी घरमालकास अटक केली आहे.
प्रेमबाबू जुगल सिंग असे या चाळमालकाचे नाव असून मनोरमानगर भागात त्याच्या चाळी आहेत. या चाळीमध्ये पीडित दाम्पत्य भाडय़ाने राहत असून १९ जानेवारीला रात्रीच्या सुमारास प्रेमबाबू हा त्यांच्या घरामध्ये जबरदस्तीने शिरला व त्याने भाडेकरूला बेदम मारहाण केली. त्यानंतर त्याने भाडेकरूच्या पत्नीलाही मारहाण केली व धमकी देत पतीदेखतच तिचा विनयभंग केला. या प्रकरणी पीडित महिलेने दिलेल्या तक्रारीवरून कापूरबावडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलिसांनी प्रेमबाबूला अटक केली आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा