ठाणे रेल्वे स्थानकातील सॅटीस पुलावर ठाणे परिवहन सेवेची (टी.एम.टी.) बस बंद पडून निर्माण झालेली वाहतूक कोंडी आणि प्रवाशांना सहन करावा लागलेला मनस्ताप ही घटना ताजी असतानात शुक्रवारी गोखले रोडवर आणखी एक बस बंद पडली. त्यामुळे या मार्गावरील वाहतूक काही काळ ठप्प झाली होती. वारंवार घडणाऱ्या अशा घटनांमुळे प्रवासी वर्ग हैराण झाला आहे.
ठाणे शहराला वाहतूक कोंडीचा विळखा बसला असून यात आता टीएमटीच्या बंद पडणाऱ्या बसेसची भर पडू लागली आहे. टीएमटीच्या ताफ्यातील सीएनजीच्या बसेस बंद पडताच लॉक होतात. क्रेन येईपर्यंत या बसेस जागेवरून हलविता येत नसल्याने या बसच्या पाठीमागे वाहनांच्या रांगा लागतात. त्यामुळे ठाणेकरही हैराण झाले आहेत. शुक्रवारी गोखले रोडवरील नवजीवन बँकेसमोर सायंकाळी ५ ते ५.३० दरम्यान टीएमटीची बस बंद पडली. काही वेळातच या बसच्या पाठीमागे वाहनांच्या लांब रांगा लागल्या होत्या. ऐन गर्दीच्या वेळेत ही बस बंद पडल्याने दोन्ही बाजूकडे जाणाऱ्या मार्गावरील वाहतूक काही काळ ठप्प झाली होती.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा