भाईंदर पोलिसांच्या तावडीतून एका आरोपीने हातकडीसह पळ काढला आहे. आरोपीला न्यायालयातुन पोलीस ठाण्यात आणले जात असताना चालत्या गाडीतून उडी मारून तो पसार झाला आहे. २४ तास उलटूनही आरोपीला पकडण्यात पोलिसांना यश आलेले नाही.

भाईंदर पोलिसांनी दुर्गेश गुप्ता या आरोपीला मोबाईल चोरी प्रकरणात अटक केली होती. गुरुवारी त्याला ठाणे न्यायालयात हजर करण्यात आले होते. न्यायालयाने त्याला पोलीस कोठडी सुनावली होती. त्याला घेऊन पोलिसांचे एक पथक भाईंदरला येत होते. मात्र परतत असतानाच चक्क चालत्या गाडीतून या आरोपीने बेडीसह पळ काढल होता. पोलिसांनी नाकाबंदी करून त्याचा शोध सुरू केला. मात्र २४ तास उलटूनही तो पोलिसांना सापडला नाही.

अद्याप आरोपी मिळाला नसून शोध मोहीम सुरु असल्याची माहिती मिरा भाईंदर वसई विरार पोलीस आयुक्तालयाचे जनसंपर्क अधिकारी बलराम पालकर यांनी दिली.

Story img Loader