मुंबई : भांडण सोडवण्यासाठी गेलेल्या ३२ वर्षीय तरूणाची हत्या करण्यात आल्याची गंभीर घटना ॲन्टॉप हिल परिसरात घडली. आरोपीने मृत तरूणाला पकडून त्याचे डोके पेव्हर ब्लॉकवर आपटून त्याची हत्या केली. याप्रकरणी ॲन्टॉप हिल पोलिसांनी हत्येचा गुन्हा दाखल करून आरोपीला अटक केली.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

मोहम्मद फारूख अब्दुल रेहमान शेख (३५) असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव असून तो ॲन्टॉप हिल येथील राजीव गांधी नगरमधील रहिवासी आहे. याप्रकरणी अब्दुल समद मुनावर खान (४१) याच्या तक्रारीवरून पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. तक्रारादार अब्दुल व फारूख यांचे सोमवारी भांडण झाले. भांडणाचे पर्यवसन हाणामारीत झाले. फारूख अब्दुलला मारहाण करीत होता. त्याच वेळी फिरोज शेख (३२) आणि मोहम्मद उस्मान ऊर्फ सोनू यांनी मध्यस्थी करून भांडण थांबवण्याचा प्रयत्न केला. त्यावेळी संतापलेल्या फारूखने फिरोज शेखला मारहाण करण्यास सुरू केली. आरोपीने फिरोजचे दोन्ही खांदे पकडले आणि त्याचे डोके पेव्हर ब्लॉकवर आपटले. त्यात गंभीर जखमी झालेल्या फिरोजला शीव येथील लोकमान्य टिळक रुग्णालयात नेण्यात आले. पण तेथील डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले. याप्रकरणी पोलिसांनी तक्रारदार अब्दुलचा जबाब नोंदवला. त्या आधारावर हत्येचा गुन्हा दाखल करून आरोपी फारूखला अटक केली. आरोपीने गुन्ह्यांत वापरलेले पेव्हर ब्लॉक पोलिसांनी हस्तगत केले असून याप्रकरणी अधिक तपास सुरू असल्याचे पोलिसांनी सांगितले.

Mumbai News (मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: The accused who killed a young man who went to settle a quarrel was arrested mumbai print news amy
Show comments