पुणे / नागपूर / मुंबई : नरक चतुर्दशी आणि लक्ष्मीपूजनाला रविवारी पुणे आणि पिंपरी-चिंचवड परिसरात मोठय़ा प्रमाणात फटाक्यांची आतषबाजी झाल्यामुळे या शहरांमधील हवेची गुणवत्ता ‘अतिवाईट’ श्रेणीत गेली. देशात राजधानी दिल्लीनंतर पिंपरी-चिंचवड हे दुसऱ्या क्रमांकाचे प्रदूषित शहर ठरले आहे. राज्याच्या राजधानी व उपराजधानीतही न्यायालयाचे आदेश डावलून आतषबाजी झाल्यामुळे हवेची पातळी कमालीची खालावल्याचे स्पष्ट झाले आहे.

मोठय़ा प्रमाणात सुरू असलेली बांधकामे, वाहनांचा धूर यामध्ये फटाक्यांच्या धुराची भर पडल्यामुळे दिवाळीमध्ये प्रदूषण नेहमीच वाढते. हे लक्षात घेऊन उच्च न्यायालय तसेच सर्वोच्च न्यायालयाने फटाके फोडण्यावर वेळेचे बंधन घातले होते. मात्र ही मर्यादा कुठेही पाळली गेली नसल्याचे स्पष्ट झाले आहे. मुंबई, नागपूर, पुणे ही महानगरेही त्याला अपवाद नाहीत. प्रदूषण रोखण्यासाठी पिंपरी-चिंचवड आणि पुणे महापालिकांनी मार्गदर्शक सूचना जारी केल्या होत्या. मात्र रविवारी नरक चतुर्दशी असल्याने पहाटेपासूनच फटाके फोडण्यास सुरुवात झाली. शहरात ठिकठिकाणी दिवसभर आतषबाजी सुरूच होती. सायंकाळी लक्ष्मीपूजनानंतर सुरू झालेले मोठय़ा आवाजाचे फटाके रात्री उशिरापर्यंत फुटत होते. हवेची गुणवत्ता मोजणाऱ्या ‘सफर’ प्रणालीनुसार सोमवारी प्रदूषणकारी धूलिकणांचे प्रमाण शिवाजीनगरमध्ये ३८२, कोथरूडमध्ये ३५८, कात्रजमध्ये ३५५, हडपसरमध्ये ३३२, पाषाणमध्ये ३१५, लोहगावमध्ये ३८२, पिंपरी चिंचवडमधील भूमकर चौकात ३१३, भोसरीमध्ये ३४२, निगडी ३४१, आळंदी ३१२ नोंदविले गेले.

pune ranked 4th globally for traffic congestion as tomtom traffic index report
विश्लेषण : वाहतूक कोंडीचे परिणाम काय?
Mahayuti Government
Shiv Sena : महाराष्ट्राला लवकरच तिसरा उपमुख्यमंत्री मिळणार,…
pune traffic jam issue
वाहतुकीचे तीनतेरा
Mumbai , constructions, MHADA , projects, Notices ,
मुंबई : उल्लंघन करणाऱ्या ४७७ बांधकामांना नोटीस, ३३ प्रकल्पांना काम थांबविण्याचे म्हाडाचे आदेश
Garbage collection, pune , Garbage collection night ,
पुणे शहरात आता रात्रीही होणार कचरासंकलन, हे आहे कारण ?
Pimpri , Disaster Management, Japanese Technology ,
पिंपरी : आपत्तीचे संकट रोखण्यासाठी जपानी तंत्रज्ञान
Greenhouse gas emissions from country decreased 7 93 percent in 2020
हरित वायू उत्सर्जनात मोठा दिलासा, जाणून घ्या, हरित वायू उत्सर्जनाची स्थिती
climate change creating favorable environment for mosquito borne diseases
वातावरणातील बदलांमुळे साथींचे आजारही बारमाही? हिवताप, डेंग्यू, लेप्टो, इन्फ्लुएन्झाचा धोका सदासर्वकाळ?

हेही वाचा >>>शिंदे गटातील दोन बड्या नेत्यांचे एकमेकांवर गंभीर आरोप, ठाकरे गटाची प्रतिक्रिया, म्हणाले, “गद्दारीचे वाभाडे…”

मुंबईची हवा ‘अतिवाईट’

मुंबईतील हवेचा दर्जा सलग दुसऱ्या दिवशी खालावलेला होता. सोमवारी महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या नोंदीनुसार मुंबईच्या हवेची गुणवत्ता अतिवाईट स्वरूपाची होती. मालाड येथे सोमवारी अतिवाईट हवेची नोंद झाली. तिथे हवा गुणवत्ता निर्देशांक ३०७ नोंदवला गेला. कुलाबा येथे २०७, बोरिवली येथे २२३, बांद्रा कुर्ला कॉम्प्लेक्स येथे २२३ होता. मागील तीन दिवस पावसाच्या शिडकाव्यामुळे सुधारलेली हवा फटाक्यांनी पुन्हा खराब केली.

दिल्ली जगात सर्वाधिक प्रदूषित

रविवारी पावसाचा शिडकावा झाल्यामुळे गेल्या आठ वर्षांतील दिवाळीच्या काळातील सर्वात स्वच्छ हवा राजधानीमध्ये अनुभवायला मिळाली होती. मात्र त्यानंतर रविवारी संध्याकाळपासून रात्री उशिरापर्यंत सुरू असलेल्या आतषबाजीमुळे सोमवारी सकाळी पुन्हा एकदा दिल्लीतील हवेची पातळी खालावली. परिणामी स्वित्र्झलडस्थित ‘आयक्यू एअर’ या प्रदूषणाच्या नोंदी ठेवणाऱ्या कंपनीच्या आकडेवारीनुसार दिल्ली हे जगातील सर्वाधिक प्रदूषित शहर ठरले आहे.

हेही वाचा >>>मुंबई : बोनसवरील आयकर कापण्याविरोधात कामगार संघटनांचा न्यायालयात जाण्याचा इशारा

नागपूरची हवा बिघडली

  • ’उपराजधानी नागपुरातही रात्री ८ ते १० या कालमर्यादेचे उल्लंघन करून फटाके फोडले गेले.
  • ’रविवारी पहाटेपासूनच शहरात मोठय़ा आवाजाचे व धूर पसरविणारे फटाके वाजविले जात होते.
  • ’सायंकाळी हे प्रमाण वाढले व मध्यरात्रीपर्यंत हा प्रकार सुरू होता.
  • ’परिणामी शहराच्या चारही स्थानकांवरील हवा गुणवत्ता निर्देशांक २०० ते २४० म्हणजेच ‘वाईट’ या वर्गवारीत नोंदविला गेला.
  • ’तब्बल सात तास हा निर्देशांक याच श्रेणीवर कायम होता.

Story img Loader