वडाळा येथील मुंबई महानगरपालिकेच्या ॲक्वर्थ कुष्ठरोग रुग्णालयाच्या आवारातील रोमन कॅथलिक चर्चने कात टाकली असून महानगरपालिकेच्या पुरातन वास्तू जतन कक्षाने चर्चच्या जिर्णोद्धार प्रकल्पाचे काम नुकतेच पूर्ण केले. नाताळच्या पार्श्वभूमीवर हे छोटेसे टुमदार चर्च सर्वांसाठी खुले करण्यात आले आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

हेही वाचा >>>मुंबई: गोवर विशेष लसीकरण :पहिल्या टप्प्यात राज्यातील एक लाख बालकांचे लसीकरण

वडाळा येथील महानगरपालिकेचे ॲक्वर्थ कुष्ठरोग रुग्णालय १३२ वर्षे जुने असून या रुग्णालयाच्या आवारात मंदिर, चर्च, मशीद, विपश्यना केंद्र, संग्रहालय, अधिकाऱ्यांचे बंगले आहेत. या सर्व वास्तूंना पुरातन वास्तू वारसा २ चा दर्जा बहाल करण्यात आला आहे. महानगरपालिकेच्या पुरातन वारसा जतन कक्षाच्या वतीने मुंबईतील विविध पुरातन वारसा वास्तू, पुतळे, स्मारके यांचे जतन करण्यात येत आहे. त्याचाच एक भाग म्हणून या रुग्णालयाच्या आवारातील पुरातन रोमन कॅथलिक चर्चचा नुकताच जीर्णोद्धार करण्यात आला. नाताळच्या पार्श्वभूमीवर हे चर्च रुग्ण व रुग्णालयातील कर्मचाऱ्यांसाठी खुले करण्यात आले.

Mumbai News (मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: The antiquities preservation unit of the mumbai metropolitan municipality has completed the restoration project of the roman catholic church mumbai print news amy