मुंबई : बीडीडी चाळ, कामाठीपुरा, भेंडीबाजार, धारावी… मुंबईच्या इतिहासातील अनेक महत्त्वाच्या घडामोडींच्या साक्षीदार असलेल्या वसाहतींमध्ये पुनर्विकासाची प्रक्रिया जोराने सुरू आहे. नजीकच्या काळात या वसाहतींचा कायापालट होणार आहेच; पण त्याबरोबरीने मुंबई नगरीचेही रूप पूर्णपणे बदलून जाणार आहे. या स्थित्यंतराचा वेध घेणाऱ्या ‘नवे क्षितिज’ या ‘लोकसत्ता’च्या कॉफी टेबल पुस्तकाचे आज, बुधवारी राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते प्रकाशन होणार आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

जन्मापासून आडव्या विस्तारत गेलेल्या मुंबईत गगनचुंबी इमारतींनी जागा बनवली असली तरी, आजही अनेक भागांतील क्षितिज जीर्ण इमारती किंवा अस्ताव्यस्त पसरलेल्या झोपडपट्ट्यांनी व्यापले आहे. हे रूप बदलण्यास राज्य सरकारने प्राधान्य दिले असून गेल्या काही वर्षांत अनेक महत्त्वाकांक्षी पुनर्विकास प्रकल्प हाती घेण्यात आले आहेत. बीडीडी चाळ, धारावी यांसारख्या एका नगराच्या आकाराच्या वसाहतींच्या नियोजनबद्ध पुनर्विकासाला गती मिळाली आहे तर मुंबईतील जुन्या उपकरप्राप्त इमारती, मोतीलाल नगर, अभ्युदय नगर यांसारख्या वसाहतींनाही पुनर्विकासाचे वेध लागले आहेत. दुसरीकडे, मुंबईलगतच्या ठाण्यात समूह पुनर्विकासाने आकार घ्यायला सुरुवात केली आहे. या प्रकल्पांमधून मोठ्या संख्येने गृहनिर्मिती होऊ घातली असताना राज्यात अनेक ठिकाणी नवीन नगरे उदयास येण्याच्या मार्गावर आहेत. गृहनिर्मितीचे आकाश विस्तारणाऱ्या या सर्व प्रकल्पांचा ‘नवे क्षितिज’ या कॉफी टेबल पुस्तकातून वेध घेण्यात आला आहे.

हेही वाचा : बांधकाम विभागाच्या पत्राकडे नौदलाचे दुर्लक्ष?

राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते या पुस्तकाचे बुधवारी प्रकाशन करण्यात येणार असून या सोहळ्यास बांधकाम क्षेत्रातील व्यावसायिक, तज्ज्ञ, अभ्यासक तसेच प्रशासकीय अधिकारी यांची उपस्थिती असणार आहे.

मुख्य प्रायोजक : महाराष्ट्र औद्याोगिक विकास महामंडळ आणि महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळ

सहप्रस्तुती : सिडको

साहाय्य : महाराष्ट्र गृहनिर्माण व क्षेत्रविकास प्राधिकरण (म्हाडा), झोपडपट्टी पुनर्वसन प्राधिकरण, बृहन्मुंबई, महानिर्मिती

सहप्रायोजक : हिरानंदानी ग्रुप, वैभवलक्ष्मी ग्रुप, सुमित ग्रुप, एम पी ग्रुप, रुस्तमजी ग्रुप आणि रिजेन्सी ग्रुप

Mumbai News (मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: The coffee table book of loksatta will be released today by deputy chief minister devendra fadnavis css