मुंबई:  गेल्या वर्षी राज्य सरकारने ज्येष्ठ नागरिक व महिलांसाठी जाहीर केलेली सवलत राज्य परिवहन महामंडळाच्या (एसटी) पथ्यावर पडली आहे. या दोन सवलतींच्या बदल्यात सरकारकडून दरवर्षी अनुदानापोटी  कोटय़वधींची रक्कम एसटी महामंडळाला मिळत असल्याने एसटी महामंडळाला गेली तीस वर्षे सोसावा लागलेला नऊ हजार कोटी रुपयांचा तोटा कमी होऊ लागला आहे. 

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

महाविकास आघाडीने एसटीला ३०० कोटी रुपये देण्याचे मंजूर केले होते. त्यातील काही रक्कम दिली जात आहे. मासिक व दैनंदिन खर्चातील एसटीचा तोटा कमी होत चालला आहे.यापूर्वी एसटीला महिन्याला ९० ते १०० कोटी रुपये तोटा होत होता. तो आता २६ ते ३३ लाखापर्यंत खाली आला आहे. एसटीला काही महिन्यांनी नफा झाला, तरी आश्चर्य वाटायला नको, असे वरिष्ठ अधिकाऱ्यांनी सांगितले.गेली ३३ वर्षे एसटीला तोटा सहन करावा लागत आहे. हा तोटा वाढत जाऊन संचित तोटा ९ हजार कोटीच्या घरात गेला आहे. मागील वर्षी एसटीचा सहा महिने संप झाल्याने हा तोटा अधिक वाढला. यावर सरकार आणि एसटी प्रशासनाने केलेल्या उपाययोजनांमुळे हा तोटा कमी होत आहे.

उपोषणाच्या पाचव्या दिवशी मनोज जरांगेंचे हात थरथरले; देवेंद्र फडणवीस म्हणाले, “त्यांच्याबरोबरच्या…”

स्वातंत्र्याच्या अमृतमहोत्सवानिमित्त  ७५ वर्षांवरील  नागरिकांना मोफत एसटी प्रवास सेवा जाहीर करण्यात आली. याच वेळी महिलांसाठी ५० टक्के तिकीट दरात सवलत देण्यात आली.  एसटीला आर्थिक मदत करण्यापेक्षा सवलतीच्या बदल्यात राज्य सरकारकडून अनुदान देण्यात आले आहे. सवलतीची ही रक्कम टप्प्याटप्प्याने एसटीला दिली जात आहे.  .

१८ आगार फायद्यात

एसटीचे सर्वसाधारण उत्पन्न वर्षांला ७५३ कोटी रुपये आहे. मागील वर्षांपासून ते ९०० कोटीपर्यंत गेले आहे. यात राज्य सरकारने जाहीर केलेल्या सवलत योजनेचा परतावा रकमेचा समावेश आहे. एसटीच्या राज्यातील एकूण ३१ विभागीय आगारातील १८ आगार फायद्यात चालत आहेत. राज्यात एकूण १६ हजार एसटी दररोज धावत असून ५५ लाख प्रवासी प्रवास करीत आहेत.

Mumbai News (मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: The concession announced by the state government for senior citizens and women has been started by the state transport corporation amy
Show comments