तळोजा कारागृहातील दयनीय स्थिती दाखवण्यासाठी कच्च्या कैद्याने अजब क्लृप्ती केली. त्याने मेलेल्या डासांनी भरलेली बाटलीच न्यायालयात सादर करून कारागृहात मच्छरदाणी उपलब्ध करण्याची मागणी केली. न्यायालयाने मात्र त्याची ही मागणी फेटाळली.कुख्यात गुंड एजाज लकडावाला याने मच्छरदाणीची मागणी केली होती. मात्र त्याला ती नाकारण्यात आली. त्यामुळे कारागृहातील स्थिती दाखवण्यासाठी त्याने मेलेल्या डासांनी भरलेली बाटली न्यायालयात आणली. तसेच मच्छरदाणी देण्याचे आदेश द्यावेत अशी मागणी केली. त्याने केलेल्या कृतीचा फारसा उपयोग झाला नाही. याउलट डासांपासून वाचण्यासाठी लकडावाला ओडोमोस किंवा अन्य औषधे वापरू शकतो, असे नमूद करून न्यायालयाने त्याची मच्छरदाणीची मागणी फेटाळली.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip

हेही वाचा >>>मुंबईत फॅशन स्ट्रीट भागात भीषण आग; अग्निशमन दलाच्या सहा गाड्या दाखल

लकडावाला हा कुख्यात गुंड दाऊद इब्राहिमचा माजी सहकारी आहे. लकडावाला याला जानेवारी २०२० मध्ये अटक करण्यात आली होती आणि तेव्हापासून नवी मुंबईतील तळोजा तुरुंगात बंदिस्त आहे. मच्छरदाणी वापरण्याची परवानगी मिळावी यासाठी लकडावाला याने नुकताच महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी नियंत्रण कायद्यांतर्गत (मोक्का) स्थापन विशेष न्यायालयात अर्ज केला होता. अटकेनंतर आपल्याला सर्वप्रथम न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली, त्यावेळी मच्छरदाणी वापरण्यास परवानगी देण्यात आली होती. परंतु या वर्षी मे महिन्यात कारागृह प्रशासनाने सुरक्षेच्या कारणास्तव त्याची मच्छरदाणी जप्त केली, असा दावा लकडावाला याने याचिकेत केला होती.

हेही वाचा >>>अंगडिया खंडणी प्रकरण: निलंबित उपायुक्त त्रिपाठी यांना अटकेपासून संरक्षण

लकडावाला याला गुरुवारी न्यायालयासमोर हजर करण्यात आले असता त्याने मेलेल्या डासांनी भरलेली प्लास्टिकची बाटली दाखवून तळोजा कारागृहातील कैद्यांना दररोज या समस्येला सामोरे जावे लागत असल्याचे न्यायालयाला सांगितले. सुरक्षेचे कारण देऊन तुरुंग प्रशासनाने लकडावाला याच्या याचिकेला विरोध केला. न्यायालयानेही कारागृह प्रशासनाचे म्हणणे मान्य केले आणि डासांपासून वाचण्यासाठी अन्य औषधांचा पर्याय लकडावाला याच्याकडे उपलब्ध असल्याचे स्पष्ट करून त्याची मागणी फेटाळली.

हेही वाचा >>>“तुम्हाला कधी कळलं की तुम्ही मुख्यमंत्री होणार आहात? आमच्यासारखं अचानक की…”; शिंदे हसून म्हणाले, “मी जी हिंमत…”

दरम्यान, लकडावालाव्यतिरिक्त तळोजा कारागृहातील अनेक कच्च्या कैद्यांनीही मच्छरदाणीसाठी अर्ज दाखल केले आहेत. काही प्रकरणांमध्ये आरोपींना मच्छरदाणी देण्याचे आदेश देण्यात आले, तर काही आरोपींची मागणी फेटाळण्यात आली.कुख्यात गुंड डी. के. राव याला न्यायालयाने मच्छरदाणी वापरण्याची परवानगी दिली होती. दुसरीकडे शहरी नक्षलवाद प्रकरणातील काही आरोपींनाही मात्र मच्छरदाणी देण्याची परवानगी नाकारण्यात आली होती. मानवाधिकार कार्यकर्ते गौतम नवलखा यांनीही मच्छरदाणी वापरण्याची परवानगी मागणारा अर्ज केला होता. तो अद्याप प्रलंबित आहे.