मुंबई : विधानसभा निवडणुकीचे उमेदवारी अर्ज मागे घेण्याची मुदत उद्या, सोमवारी दुपारी ३ वाजेपर्यंत आहे. त्यामुळे ऐन दिवाळीत बंडखोरांनी माघार घ्यावी यासाठी सर्वच राजकीय पक्षांच्या नेत्यांचे रविवारी दिवसभर प्रयत्न सुरू होते. माहीम मतदारसंघात अमित ठाकरे यांच्या विरोधात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे कोणती भूमिका घेतात, भाजपचे गोपाळ शेट्टी, राष्ट्रवादी (अजित पवार) पक्षाचे नवाब मलिक, समीर भुजबळ आदी काही महत्त्वाचे बंडखोर माघार घेतात का, याकडे आता सगळ्या राज्याचे लक्ष लागले आहे.

पाडवा, भाऊबीजेला एरवी सारी नेतेमंडळी घरात कुटुंबीयांसह किंवा फारफार तर आपल्या मतदारसंघात दिसतात. यंदा मात्र सर्व पक्षांतील महत्त्वाच्या नेत्यांची दिवाळी बंडखोरांची मनधरणी करण्यातच गेली. महायुती आणि महाविकास आघाडीत मोठ्या प्रमाणावर बंडखोरी झाली असून त्याचा फटका अधिकृत उमेदवारांना बसू शकतो. ही बंडखोरी टाळण्यासाठी साम, दाम, दंड, भेद अशा साऱ्या उपायांचा वापर केला जात आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची बंडखोरांच्या संदर्भातच रविवारी दुपारी बैठक पार पडली. कोणत्या मतदारसंघातून कोणी माघार घ्यावी यावर उभयतांमध्ये नियोजन करण्यात आले. यांत सर्वांत कळीचा माहीम मतदारसंघ आहे. मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांचे पुत्र अमित यांच्यासाठी शिवसेनेने (शिंदे) माघार घ्यावी म्हणून भाजपचा दबाव असतानाच त्या पक्षाचे विद्यामान आमदार सदा सरवणकर लढण्यावर ठाम आहेत. अमित ठाकरे यांचा प्रचार करू, अशी भूमिका भाजपने घेतल्यामुळे आता मुख्यमंत्री काय करणार, यावर सारे अवलंबून असेल. देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री होतील हे राज ठाकरे यांनी चार दिवसांपूर्वी केलेले विधान शिंदे यांना फारसे पसंत पडलेले नसल्याचे शिवसेनेच्या गोटातून सांगण्यात येते. भाजपने दबाव फारच वाढविला तरच शिंदे माघार घेतील, अशी शक्यता आहे.

Nawab Malik big claims about maharashtra Election
Nawab Malik: शरद पवार आणि एकनाथ शिंदे संपर्कात?, ‘निवडणुकीनंतर काहीही होऊ शकतं’, नवाब मलिक यांचा दावा
21 November 2024 Rashi Bhavishya
२१ नोव्हेंबर पंचांग: वर्षातील शेवटचा गुरुपुष्यामृत योग कोणत्या…
Gopal Shetty on Devendra Fadnavis
Gopal Shetty: अर्ज मागे घेण्यासाठी ईडीची चौकशी लागणार? गोपाळ शेट्टी यांनी देवेंद्र फडणवीसांबद्दल म्हटले…
Manoj Jarange News
Manoj Jarange : “मराठे निवडणूक लढवणार नाहीत, कारण एका जातीवर…”; मनोज जरांगेंची मोठी घोषणा
Criticism between the ruling party and the opposition vidhan sabha election 2024
‘दशकभराच्या पीछेहाटी’वरून सत्ताधारी-विरोधकांत कलगीतुरा
Maharashtra Assembly Election 2024 Mahayuti Mahavikas Aghadi final Seat Sharing Formula
Maharashtra Assembly Election 2024 : महायुती व महाविकास आघाडीचा जागावाटपाचा फॉर्म्युला ठरला! सहा पक्षांकडून इतके उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात
nawab malik son in law sameer khan passed away
नवाब मलिक यांच्या जावयाचे निधन; काही दिवसांपूर्वी झाला होता गंभीर अपघात, निवडणूक काळात कुटुंबावर कोसळला दुःखाचा डोंगर
Maharashtra Assembly Election 2024 Live Updates in Marathi
Maharashtra Assembly Election 2024 : कोल्हापूर काँग्रेसमध्ये दोन गट? शाहू महाराज – सतेज पाटील यांच्यातील संबंधात कटुता?

हेही वाचा >>>नवाब मलिक यांच्या जावयाचे निधन; काही दिवसांपूर्वी झाला होता गंभीर अपघात, निवडणूक काळात कुटुंबावर कोसळला दुःखाचा डोंगर

दुसरीकडे बोरिवलीमध्ये गोपाळ शेट्टी यांनी भाजपची डोकेदुखी वाढविली आहे. शेट्टी यांनी शनिवारी फडणवीस यांची भेट घेतली. भाजपचे राष्ट्रीय सरचिटणीस विनोद तावडे यांच्या पुढाकाराने ही भेट झाली. ‘भाजप कधीच सोडणार नाही आणि पक्षाचे नुकसान होईल, असे काही करणार नाही,’ अशी ग्वाही शेट्टी यांनी दिल्याची माहिती तावडे यांनी ‘एक्स’ समाज माध्यमातून दिली. या संदर्भात शेट्टी यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी अंतिम निर्णय सोमवारी घेतला जाईल, असे स्पष्ट केले. फडणवीस, तावडे आणि शेलार यांची भेट घेतल्याने शेट्टी माघार घेतील, असे भाजपच्या वर्तुळात बोलले जाते.

मानखुर्द-शिवाजीनगर मतदारसंघातून राष्ट्रवादीचे अधिकृत उमेदवार नवाब मलिक यांच्या उमेदवारीस भाजपने आक्षेप घेतला आहे. मलिक यांच्याबाबत सोमवारी दुपारी ३ वाजता चित्र स्पष्ट होईल, असे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी म्हटले आहे. मलिक अद्याप लढण्यावर ठाम असले तरी ते माघार घेतात का, याची उत्सुकता आहे. नांदगावमध्ये समीर भुजबळ यांनी मुख्यमंत्र्यांचे निकटवर्तीय आमदार सुहास कांदे यांच्यासाठी माघार घ्यावी, असे शिवसेनेचे प्रयत्न आहेत. समीर यांनी पक्षाचा राजीनामा देऊन अपक्ष निवडणूक लढण्याचा निर्णय घेतला आहे. त्यांच्या निर्णयाशी पक्षाचा काहीही संबंध नसेल, असे छगन भुजबळ यांनी स्पष्ट केले. भाजपने समीर भुजबळ यांच्यावर दबाव आणावा, अशी मुख्यमंत्र्यांची भूमिका आहे. महायुतीत नवी मुंबईत पेच निर्माण झाला आहे. बेलापूरमध्ये विजय नहाटा आणि ऐरोलीमध्ये विजय चौगुले हे मुख्यमंत्र्यांचे समर्थक दोघेही माघार घेण्यास तयार नाहीत. गणेश नाईक भाजप तर त्यांचे पुत्र संदीप हे राष्ट्रवादी शरद पवार गटाचे उमेदवार कसे चालतात, असा दोघांचा सवाल आहे. त्यामुळे दोघांची समजूत काढताना मुख्यमंत्र्यांची कसोटी लागली आहे.

हेही वाचा >>>संतापजनक! दोन वाहतूक पोलिसांना कारच्या बोनेटवरून फरफटत नेलं; दिल्लीतील घटना

काँग्रेसच्या ३० ते ३५ बंडखोरांनी उमेदवारी माघार घ्यावी यासाठी गेले दोन दिवस युद्ध पातळीवर प्रयत्न सुरू आहेत. पक्षाचे प्रभारी रमेश चेन्नीथला, राजस्थानचे माजी मुख्यमंत्री अशोक गहलोत, सरचिटणीस अविनाथ पांडे आदी नेतेमंडळी मुंबईत ठाण मांडून आहेत. पक्षाच्या सर्व बंडखोरांशी वैयक्तिक संपर्क साधण्यात येत आहे. ज्यांच्याशी संपर्क होऊ शकत नाही अशा बंडखोरांकडे नेतेमंडळींना पाठविण्यात आले आहे. १० ते १२ जण ऐकण्याच्या मन:स्थितीत नाहीत, असे सांगण्यात आले. राष्ट्रवादीत पक्षाध्यक्ष शरद पवार यांनीच बंडखोरांशी चर्चा करून माघारीचे आवाहन केले. शिवसेना ठाकरे गटानेही काही नेत्यांवर ही जाबबादारी सोपविली आहे. शरद पवार, उद्धव ठाकरे आणि रमेश चेन्नीथला हे परस्परांच्या संपर्कात असून, तिन्ही पक्षांनी परस्परांच्या विरोधातील उमेदवार मागे घ्यावेत या दृष्टीने प्रयत्न करण्यात येत होते.

भाजपचे जे नाराज उमेदवार आहेत ते सगळे आपले अर्ज वापस घेतील असा विश्वास आहे. एखाद-दोन ठिकाणी अडचण होऊ शकते. पक्षाच्या विरोधात जाऊ नका, अशी विनंती महायुतीच्या बंडखोरांना आम्ही केली आहे. अर्ज मागे घेतले नाहीत तर पक्षाचे दरवाजे बंद होतील. – चंद्रशेखर बावनकुळे, प्रदेशाध्यक्ष, भाजप