मालाड पुर्व मधील पिंपरीपाडा परिसरात २० फूट उंच भिंत आजूबाजूच्या झोपडय़ांवर कोसळून झालेल्या दुर्घटनेतील मृतांचा आकडा २६ झाला आहे.

मालाडमधील राणी सती मार्गावर पालिकेच्या जलाशयाची २० फूट उंच भिंत आजूबाजूच्या झोपडय़ांवर कोसळून झालेल्या दुर्घटनेत १८ जणांचा घटनास्थळीच मृत्यू तर १३ जण गंभीर जखमी झाले होते. त्यानंतर आता मृतांचा आकडा २६ झाला आहे. तुफान पावसामुळे ही भिंत कोसळली होती. या घटनेतील मृतांच्या कुटुंबीयांना महापालिकेकडून प्रत्येकी ५ लाखांची मदत जाहीर करण्यात आली आहे.

Story img Loader