मुंबई : गणेशोत्सव अवघ्या काही दिवसांवर येऊन ठेपला असून गणेशोत्सवात पर्यावरणपूरक आणि इतर मूर्तींमधील फरक समजावा यासाठी महापालिकेने गणेशमूर्तींवर विविध प्रकारचे शिक्के मारण्याचे आदेश दिले होते. मात्र मूर्तीवर अशा खुणा करण्यास भाजपने कडाडून विरोध केला आहे. गणेशोत्सव हा लाखो भाविकांच्या आस्थेचा विषय असल्याने या निर्णयाऐवजी दुसरा पर्याय शोधावा असे मुंबई उपनगर जिल्ह्याचे पालकमंत्री मंगल प्रभात लोढा यांनी महापालिकेचे आयुक्त इक्बाल सिंह चहल यांना पत्र पाठवून कळवले होते. दरम्यान, हा निर्णय आधीच रद्द करण्यात आल्याचे महानगरपालिका प्रशासनाने स्पष्ट केले.प्लास्टर ऑफ पॅरिसच्या मूर्तींना बंदी घालण्याच्या निर्णयाची टप्प्याटप्प्याने अंमलबजावणी करण्यात येणार आहे. त्याकरीता महानगरपालिकेने घरगुती गणेशमूर्ती शाडूच्या किंवा पर्यावरणपूरक साहित्यापासून साकारण्याचे निर्देश दिले होते. तसेच पर्यावरणपूरक व शाडूच्या मातीची मूर्तीतील फरक कळावा म्हणून मूर्तीच्या मागे उजव्या खांद्यावर हिरव्या रंगाचे वर्तुळ आणि ‘पीओपी’ची असल्यास लाल रंगाच्या वर्तुळाची खूण करण्याचे निर्देश महानगरपालिका प्रशासनाने मूर्तिकारांना दिले होते. तसेच याबाबत वर्तमानपत्रात जाहिरात देऊन जनजागृतीही करण्यात आली होती. पालकमंत्र्यांनी या निर्णयाला विरोध केला आहे.
पर्यावरणपूरक गणेशमूर्तीवर खूण करण्याचा निर्णय रद्द; भाजपच्या विरोधानंतर महानगरपालिकेने घेतला निर्णय
गणेशोत्सव अवघ्या काही दिवसांवर येऊन ठेपला असून गणेशोत्सवात पर्यावरणपूरक आणि इतर मूर्तींमधील फरक समजावा यासाठी महापालिकेने गणेशमूर्तींवर विविध प्रकारचे शिक्के मारण्याचे आदेश दिले होते.
Written by लोकसत्ता टीम
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Already have an account? Sign in
First published on: 11-09-2023 at 20:11 IST
Mumbai News (मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: The decision to mark the eco friendly ganesha idol is cancelled mumbai print news amy