मुंबई: राज्य शासनातील प्रतिनियुक्तीबाबतचे नियम धाब्यावर बसवून २२ वर्षांच्या सेवेत तब्बल १७ वर्षे प्रतिनियुक्तीवर असलेल्या जलसंपदा विभागातील अभियंत्याला तात्काळ कार्यमुक्त करण्याऐवजी वर्षभराची मुदतवाढ देण्यात आली आहे. झोपडपट्टी पुनर्वसन प्राधिकरणात गेल्या चार वर्षांपासून प्रतिनियुक्तीवर असलेल्या या अभियंत्याला मुदतवाढ देण्याचा प्रस्ताव मुख्यमंत्र्यांनी मंजूर केल्यामुळे प्रतिनियुक्तीबाबतच्या धोरणाला अर्थ राहिलेला नाही, अशी चर्चा केली जात आहे.

झोपडपट्टी पुनर्वसन प्राधिकरणातील कार्यकारी अभियंता मिलिंद वाणी हे मूळ जलसंपदा विभागात असतानाही इमारत परवानगी तसेच निवासयोग्य प्रमाणपत्र देण्याच्या महत्त्वाच्या विभागात काम करीत आहेत. आतापर्यंत धुळे महानगरपालिका येथे शहर अभियंता, मिरा-भाईंदर महानगरपालिका येथे शहर अभियंता, मुंबई महानगर क्षेत्रविकास प्राधिकरणात कार्यकारी अभियंता तसेच महाराष्ट्र मेरीटाईम बोर्ड येथे कार्यकारी अभियंता असा त्यांचा प्रतिनियुक्तीचा प्रवास आहे. झोपडपट्टी पुनर्वसन प्राधिकरणात फक्त महापालिका किंवा म्हाडातील अभियंत्यांचीच प्रतिनियुक्ती केली जाते. वाणी मात्र त्यास अपवाद ठरले. 

police arrested the dumper owner in the wagholi accident case
पुणे : वाघोली अपघात प्रकरणात डंपर मालक अटकेत
Madhuri Dixit Refused Darr Offer Do You Know The Reason?
Madhuri Dixit : डर चित्रपट माधुरी दीक्षितने का…
injured young man share experience of dumper accident
पुणे : अचानक मोठ्या आवाजाने जाग आली आणि…, जखमी तरुणाचा अंगावर काटा आणणारा अनुभव
sleeping with elevated head
झोपताना डोक्याखाली उशी घेतल्याने काय परिणाम होतो? तज्ज्ञ काय सांगतात…
contract workers, contract workers water supply department , fate of 1,800 contract workers ,
१८०० कंत्राटी कर्मचाऱ्यांचे भवितव्य अंधारात, काय आहे कारण?
Solapur Mathadi kamgar protest, Mathadi kamgar,
सोलापुरात माथाडींच्या आंदोलनामुळे ५० हजार क्विंटल कांदा वाहनांमध्ये पडून
Does Sleeping in the Afternoon Really Lead to Weight Gain
Sleeping In Afternoon: दुपारी झोपल्यानंतर खरंच वजन वाढतं का? पाहा Viral Video
reasearcher obc fellowship delay by government
ओबीसी विद्यार्थ्यांच्या फेलोशिपला केंद्र सरकारकडून विलंब, विद्यार्थी अडचणीत; कारण काय?

हेही वाचा… वाचनश्रीमंत सदरांचे नवे वर्ष; ‘लोकसत्ता’च्या संपादकीय पानांमध्ये वाचनीय स्तंभ

२००४ पासून प्रतिनियुक्तीवर असलेल्या वाणी यांना १३ वर्षांच्या सलग प्रतिनियुक्तीनंतर मूळ विभागात परत पाठविण्यात आले होते. परंतु ते रुजू न झाल्याने त्यांच्याविरुद्ध शिस्तभंगाची कारवाई करण्याचे प्रस्तावित करण्यात आले. मात्र त्यानंतर ते लगेच रुजू झाले.

सामान्य प्रशासन विभागाने १७ डिसेंबर २०१६ रोजी शासन निर्णय जारी करून प्रतिनियुक्तीबाबत मार्गदर्शक तरतुदी जारी केल्या. प्रतिनियुक्तीचा कालावधी पाच वर्षांपर्यंत मर्यादित करण्यात आला. या शिवाय मूळ प्रशासकीय विभागात सेवा प्रत्यावर्तित झाल्यानंतर मूळ विभागात किमान पाच वर्षे पूर्ण करणे आवश्यक आहे. परंतु वाणी यांच्याबाबत हे सर्व नियम धाब्यावर बसविण्यात आले आहेत. झोपडपट्टी पुनर्वसन प्राधिकरणात प्रतिनियुक्ती मिळावी यासाठी २०१७ मध्ये वाणी यांनी शिफारस पत्र आणले. मात्र प्राधिकरणात जलसंपदा विभागातील अभियंत्यांला घेता येत नाही तसेच वाणी हे अनेक वर्षे प्रतिनियुक्तीवर असल्याचे स्पष्ट करून त्यांची प्रतिनियुक्तीची विनंती रद्द करण्यात आली होती. परंतु राजकीय प्रभाव वापरून वाणी हे २६ जून २०१९ रोजी प्राधिकरणात रुजू झाले. वाणी यांना आता प्राधिकरणातही चार वर्षे पूर्ण झाली आहेत. त्यांना तात्काळ कार्यमुक्त करून जलसंपदा विभागात पाठविण्यात यावे, असा प्रस्ताव जलसंपदा विभागाने पाठविला होता. मात्र गृहनिर्माण विभागाने त्याबाबत तात्काळ कार्यवाही केली नाही. या काळात वाणी यांनी झोपडपट्टी पुनर्वसन प्राधिकरणाचे अध्यक्ष व मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडून वर्षभराची मुदतवाढ मिळविण्यात यश मिळवले आहे.

‘प्रतिनियुक्ती नियमानुसारच’

प्रतिनियुक्तीबाबत शासनाने २०१६ मध्ये धोरण जाहीर केले. आपली प्रतिनियुक्ती त्यापूर्वीची आहे. हे धोरण पूर्वलक्ष्यी प्रभावाने लागू करण्याची तरतूद नाही. त्यामुळे आपली प्रतिनियुक्ती नियमानुसारच आहे, असे वाणी यांनी म्हटले आहे.

Story img Loader