मुंबई : विधानसभा निवडणुकीची घोषणा होण्याच्या आदल्या दिवशी राज्य सरकारने मुंबईच्या वेशीवरील पाचही टोलनाक्यांवर हलक्या वाहनांसाठी टोलमुक्ती दिली व त्याची मध्यरात्रीपासून अंमलबजावणीही सुरू झाली. मात्र ‘फास्टॅग’ यंत्रणा अद्यायावत न केली गेल्यामुळे पैसे परस्पर कापले गेल्याच्या तक्रारी अनेक प्रवाशांनी केल्या. त्यानंतर आता टोलमुक्त वाहनांसाठी स्वतंत्र मार्गिका ठेवण्याबाबत व हलक्या वाहनांचा टोल कापून न घेण्याबाबत आदेश देण्यात आले आहेत.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

मुलुंड, ऐरोली, दहिसर, वाशी, लालबहादूर शास्त्री मार्ग या पाच नाक्यांवरून छोटी वाहने, एस. टी. आणि शाळांच्या बसना टोलमधून सूट देण्याचा निर्णय सरकारने सोमवारी घेतला. मात्र मंगळवारी सकाळी ‘फास्टॅग’मधून टोलचे पैसे कापून घेण्यात (पान ८ वर)(पान १ वरून) आल्याचे संदेश चालकांना आले. याबाबत अनेकांनी टोलनाक्यावरील कर्मचाऱ्यांकडे आणि समाजमाध्यमांतून नाराजी व्यक्त केली. मुलुंड टोलनाक्यावर छोट्या वाहनांसाठी जास्त मार्गिका उपलब्ध करून देण्याची मागणी करण्यात आली. वसुली ठेकेदाराकडून टोल कायम असलेल्या अवजड वाहनांना प्राधान्य देण्यात येत असल्याची तक्रारही काही चालकांनी केली.

हेही वाचा >>>Baba Siddique Case : तीन महिन्यांपूर्वी रचला कट, व्हिडीओ पाहून आरोपी शूट करायला शिकले; बाबा सिद्दीकी हत्या प्रकरणात धक्कादायक माहिती समोर

याबाबत राज्य रस्ते विकास महामंडळाचे (एमएसआरडीसी) व्यवस्थापकीय संचालक अनिल गायकवाड यांच्याशी संपर्क साधला असता, संबंधित टोल कंपनीला मध्यरात्रीपासून हलक्या वाहनांना टोलमधून सूट देण्याचे आदेश दिल्याचे ते म्हणाले. ‘फास्टॅग’मधून वसुली थांबविण्याबाबत संबंधित बँकांनाही कळविण्यात आल्याची माहितीही त्यांनी दिली. प्रवाशांना कोणताही त्रास होऊ नये यासाठी पाचही टोलनाक्यांवर कार्यकारी अभियंत्यांना नियु्क्त करण्यात आले असून वाहतूक कोंडी होणार नाही याची दक्षता घेण्यास सांगण्यात आले आहे.

श्रेयवादाची लढाई सुरूच!

मुंबईच्या वेशीवर हलक्या वाहनांचा टोल बंद करण्यात आल्यावर श्रेयासाठी सत्ताधारी महायुतीमध्ये दुसऱ्या दिवशीही चढाओढ पाहायला मिळाली. मुलुंड टोल नाक्यावर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे आभार मानणारे फलक झळकविण्यात आले आहेत. त्या फलकाच्या बाजूलाच मुलुंडचे भाजप आमदार मिहिर कोटेचा यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे छायाचित्र व त्यांचे आभार मानणारे फलक लावले आहेत.

सकाळी बँका सुरू झाल्यानंतर पैसे कापण्याची हलक्या वाहनांसाठीची व्यवस्था बंद करण्यात आली. टोलनाक्यावर टोलमुक्त वाहनांसाठी स्वतंत्र मार्गिका ठेवण्याचे आणि तेथील ‘फास्टॅग’ यंत्रणा काढण्याचे आदेश संबंधित कंपनीला देण्यात आले आहेत.अनिल गायकवाड, व्यवस्थापकीय संचालक, एमएसआरडीसी

Mumbai News (मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: The fastag system is not updated even after the toll free by the state government mumbai news amy
Show comments