भायखळा येथील वीरमाता जिजाबाई भोसले उद्यान आणि प्राणिसंग्रहालयाच्या (राणीची बाग) नामाबदलाच्या लढ्याला अखेर यश आले आहे. या उद्यानातील विविध झाडांच्या प्रजाती लक्षात घेऊन राणीच्या बागेच्या नावात ‘वनस्पती उद्यान’ या शब्दाचा समावेश करण्याची मागणी सेव्ह राणीबाग बॉटनिकल गार्डन फाऊंडेशनकडून करण्यात येत होती. अखेर ही मागणी मान्य करण्यात आली असून आता राणीची बाग ‘वीरमाता जिजाबाई भोसले वनस्पती उद्यान व प्राणिसंग्रहालय’ या नावाने ओळखले जाईल.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

हेही वाचा >>>लालबागमधील अविघ्न पार्कमध्ये पुन्हा एकदा आग, अग्निशमन दलाच्या गाड्या घटनास्थळी

राणीच्या बागेच्या नावात ‘वनस्पती उद्यान’ असा उल्लेख करावा या मागणीसाठी गेली १५ वर्षे सेव्ह राणी बाग बॉटनिकल गार्डन फाऊंडेशनतर्फे पाठपुरावा करण्यात येत होता. राणीच्या बागेच्या नावात ‘वनस्पती उद्यान’ असा उल्लेख करण्याबाबतचा प्रस्ताव फाऊंडेशनने मुंबई महानगरपालिकेला पाठविला होता. अखेर महानगरपालिकेने १२ डिसेंबर २०२२ रोजी या प्रस्तावाला मंजुरी दिली. वीरमाता जिजाबाई भोसले वनस्पती उद्यान व प्राणी संग्रहालयाच्या एकूण क्षेत्रफळापैकी ६३ टक्के जागा ही वनस्पती उद्यानाची आहे. तर उर्वरित ३७ टक्के जागा प्राणीसंग्रहालय व प्रशासकीय इमारतींनी व्यापलेला आहे, अशी माहिती राणीबाग बॉटनिकल गार्डन फाउंडेशनच्या विश्वस्त हुतोक्शी रूस्तमफ्राम यांनी दिली.

हेही वाचा >>>“२०२४ ला सर्वांचा हिशोब करणार,” सोमय्यांना क्लीन चिट मिळाल्यानंतर राऊतांचा जाहीर इशारा, म्हणाले “कोणतंही सरकार…”

राणी बागेतील या वनस्पती उद्यानात वेगवेगळ्या प्रजातींच्या वनस्पतींचा समावेश आहे. यामध्ये सुमारे ५४ वनस्पती कुळातील २५६ प्रजातींची ४,१३१ झाडे आहेत. तर, ८६ झाडांच्या प्रजाती ‘दुर्मिळ’ घोषित केल्या आहेत.

“२०२४ ला सर्वांचा हिशोब करणार,” सोमय्यांना क्लीन चिट मिळाल्यानंतर राऊतांचा जाहीर इशारा, म्हणाले “कोणतंही सरकार…”तब्बल १६० वर्षांपूर्वी अँग्री हॉर्टिकल्चरल सोसायटी ऑफ वेस्टर्न इंडिया या संस्थेने ‘व्हिक्टोरिया गार्डन्स’ या नावाने एक वनस्पती उद्यानाची उभारणी केली होती.

ब्रिटिश राजवटीतील हा पहिलाच सार्वजनिक प्रकल्प होता. १८९० मध्ये या उद्यानात प्राणिसंग्रहालय उभे केले.

१९६९ मध्ये उद्यानाला ‘वीरमाता जिजाबाई भोसले उद्यान’ असे नाव देण्यात आले.

१९८० मध्ये उद्यानाच्या नावात ‘वीरमाता जिजाबाई भोसले उद्यान आणि प्राणिसंग्रहालय’ असा बदल करण्यात आला.

आता २०२२ मध्ये या उद्यानाच्या नावात ‘वीरमाता जिजाबाई भोसले वनस्पती उद्यान व प्राणी संग्रहालय’ असा बदल करण्यास महानगरपालिकेने मंजुरी दिली.

Mumbai News (मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: The fight to change the name of rani bagh in byculla was successful mumbai print news amy