मुंबई : ‘लोकसत्ता लोकांकिका स्पर्धे’चे बिगूल वाजून आता प्रत्यक्षातली लगीनघाई सुरू झाली आहे. महाविद्याालयीन तरुणाईच्या लोकांकिका स्पर्धेतील सहभागासाठीच्या लगबगीने संपूर्ण महाराष्ट्रातील वातावरण सध्या चैतन्यमय झाले आहे. लोकांकिकांच्या तालमींना जोर आला आहे. ही स्पर्धा युवकांच्या सर्जनशीलतेला वाव देण्याबरोबरच त्यांची भविष्यातील कलाकीर्द ठरवण्याच्या वाटाही खुल्या करीत असल्याने कला क्षेत्रातील त्यांच्या भवितव्याची दिशाही त्यांना यातून सापडणार आहे. त्यांची ही रंगप्रतिभा नाटक, सिनेमा आणि दूरचित्रवाणी क्षेत्रांतील ‘वलयांकित’ व्यक्तिमत्त्वांसमोर पेश करण्याची संधी त्यांना यानिमित्ताने लाभणार आहे. या तिन्ही कला क्षेत्रांतील ‘वलयांकित’ कलाकार, लेखक, दिग्दर्शक मंडळी ८ ते १४ डिसेंबरदरम्यान मुंबई, पुणे, ठाणे, रत्नागिरी, औरंगाबाद, कोल्हापूर, नागपूर आणि नाशिक या आठ केंद्रांवरील विभागीय अंतिम फेरीला प्रमुख पाहुणे म्हणून हजेरी लावणार आहेत.
सॉफ्ट कॉर्नर प्रस्तुत, पॉवर्ड बाय पार्टनर इंडियन ऑइल कॉर्पोरेशन लिमिटेड, टॅलेन्ट पार्टनर आयरिस प्रॉडक्शन आणि ‘अस्तित्व’ यांच्या सहकार्याने होत असलेल्या ‘लोकसत्ता लोकांकिका स्पर्धे’ला त्यामुळे एक आगळेवेगळे ग्लॅमर प्राप्त होत आहे. ‘झी युवा’ आणि ‘टुगेदिरग’ हे या स्पर्धेचे सहप्रायोजक आहेत.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा