छत्रपती शिवाजी महाराजांच्या मुंबईतल्या पहिल्या मंदिराचं उद्घाटन करण्याची संधी मला मिळाली यासाठी मी स्वतःला भाग्यवान समजतो. पूनम महाजन यांच्या संकल्पनेतून हे मंदिर उभं राहिलं आहे याचा मला आनंद आहे. आजचा दिवस हा सौभाग्याचा दिवस आहे असं उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip

१९ फेब्रुवारीला शिवजयंतीच्या निमित्ताने आम्ही आग्रा या ठिकाणी गेलो होतो. माननीय मुख्यमंत्री होते, सुधीर मुनगंटीवार होते, मी देखील तिथे उपस्थित होतो. आग्रा येथील किल्ल्यात गेल्यानंतर आमच्या अंगावर रोमांच उभे राहिले. तिथली प्रत्येक भिंत, प्रत्येक जागा शिवरायांचं वर्णन करत होती. अखिल हिंदुस्थाच्या त्या काळातल्या बादशहाला छत्रपतींनी थेट सुनावलं होतं की मी झुकणार नाही, वाकणार नाही. त्यांना नजरकैदेत ठेवल्यावर ज्या मुत्सदेगिरीपणाने ते तिथून निसटले आणि पुन्हा स्वराज्याची निर्मिती केली. तेव्हा जी अनुभूती आली तशीच अनुभूती या मंदिरात मला आली. आपण देश, देव आणि धर्मासाठी काम करत आहोत त्यामुळे आपलं दैवत हे छत्रपती शिवाजी महाराज आहेत असंही देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं आहे.

ज्या काळात भारतातले अनेक राजे-रजवाडे गुलाम झाले होते. त्या काळात आई जिजाऊंनी शिवरायांमध्ये देशाभिमान जागृत केला. धर्माची विटंबना कशी चालली आहे ते सांगितलं. त्यातून शिवराय घडले. स्वराज्याच्या विचारांचं रोपण शिवरायांच्या मनात आई जिजाऊंनी केलं. त्यानंतर छत्रपती शिवरायांनी स्वराज्य स्थापन केलं. आपण त्यांना यासाठीच युगपुरुष म्हणतो कारण त्यांनी मानव समाजाला वेगळी दिशा दिली. प्रभू श्रीराम हे देव होते. त्यांनी मनात आणलं असतं तर ते एकटे रावणाचा निःपात करु शकले. पण त्यांनी मानवजातीत अन्यायाविरोधात लढण्याचं रोपण मानवी मनात केलं. त्यांच्यात अभिमान जागवला. त्यानंतर रावणावर विजय मिळवला. त्यानंतर हजारो वर्षे रावण तयार झाला नाही असंही देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं आहे.

नुकतंच भाषण करताना पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले आमचा आदर्श छत्रपती शिवाजी महाराज आहेत. कारण शिवाजी महाराजांना छत्रपती घोषित केलं आणि ते भोगत बसले नाहीत. तशीच प्रेरणा पंतप्रधान नरेंद्र मोदींनी घेतली आहे. त्याच प्रेरणेतून त्यांना राज्यकारभार करायचा आहे असंही देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं आहे.

छत्रपती शिवरायांची आरती वीर सावकरांनी लिहिली आहे

छत्रपती शिवाजी महाराजांची आरती ही स्वातंत्र्यवीर सावरकर यांनी लिहिली आहे. ती लता मंगेशकर यांनी गायली आहे. छत्रपती शिवरायांमध्ये एकही गुण असा दिसत नाही ज्याचा अभाव त्यांच्यात होता. त्यांच्या प्रत्येक नितीवर जगभरात अभ्यास केला जातो हेच छत्रपतींनी आपल्याला दाखवून दिलं. छत्रपती शिवराय हे आमचे दैवत आहेत. फार कमी लोकांना ठाऊक असेल छत्रपती शिवरायांची पहिली आरती ही स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांनी लिहिली. त्यानंतर ती आरती सुरैल आवाजात लता मंगेशकर यांनी गायली आहे. या मंदिरात दोनवेळा ती आरती गुंजेल तेव्हा त्या आरतीच्या माध्यमांतून तेज मिळेल असंही देवेंद्र फडणवीस म्हणाले आहेत.