मुंबई : राज्यातील बारामती, लातूर, नांदेड, यवतमाळ, धाराशिव ही पाचही विमानतळे ‘रिलायन्स एअरपोर्ट डेव्हलपर्स लि’. कंपनीच्या ताब्यात असून ही कंपनी व्यवस्थित काम करीत नसल्याने महाधिवक्त्यांचा अभिप्राय घेऊन हे सर्व विमानतळ सरकार ताब्यात घेईल. तसेच राज्यांतर्गत विमानसेवा अधिक वाढविण्यासाठी मुख्यमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली उच्चस्तरीय बैठक घेण्यात येईल अशी ग्वाही उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधानसभेत दिली. नवी मुंबई विमानतळ पुढील वर्षी ऑगस्टपर्यंत सुरू होईल. त्यानंतर मुंबई विमानतळावरील ताण कमी होईल असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip

राज्यातील १८ पैकी केवळ सातच विमानतळ प्रवाशांसाठी उपलब्ध असल्याबद्दल अशोक चव्हाण, पृथ्वीराज चव्हाण, बाळासाहेब थोरात, अनिल देशमुख, अमित देशमुख, यशोमती ठाकूर, रोहित पवार, सुनील प्रभू, प्रणिती शिंदे,आदित्य ठाकरे आदी सदस्यांनी उपस्थित केलेल्या लक्षवेधी सूचनेवरील चर्चेदरम्यान फडणवीस बोलत होते. हे पाच विमानतळ रिलायन्स कंपनीस ३० वर्षांसाठी देण्यात आले होते. मात्र आता सरकार ते ताब्यात घेणार असल्याचे फडणवीस म्हणाले.