लोकसत्ता प्रतिनिधी

मुंबई : मुंबई महानगरपालिकेचा महत्त्वाकांक्षी प्रकल्प असलेला सागरी किनारा मार्ग डिसेंबरमध्ये पूर्णतः सुरू होऊ शकणार आहे. सागरी किनारा मार्गाचे अंतिम टोक वांद्रे वरळी सागरी सेतूला जोडण्याचा टप्पा अद्याप बाकी असून त्यानंतरच हा प्रकल्प पूर्णपणे वाहतूक सेवेत दाखल होणार आहे. डिसेंबरनंतरच मरीन ड्राईव्हहून थेट उपनगरात जाता येणार आहे.

Before putting bag in plane chemical caught fire big accident was avoided
विमानात बॅग ठेवण्यापूर्वी रसायनाने घेतला पेट, मोठी दुर्घटना टळली
11th September Rashi Bhavishya & Marathi Panchang
११ सप्टेंबर पंचांग : प्रीती योग कोणाच्या नशिबाचे उघडणार कुलूप? व्यवसायात लाभ तर मान-सन्मानात होईल वाढ; वाचा तुमचे भविष्य
Vasai, bhayandar railway station suicide, father and son suicide, Jai Mehta, dual marriage, Bhayandar railway station, southern girl
वसई : पिता पुत्राचे रेल्वे रूळावरील आत्महत्येचे गूढ उकलले; मुलाचे प्रेमसंबंध उघड
Atal Setu Viral Video
Atal Setu Viral Video : अटल सेतूवर थरार; रेलिंगच्या पलिकडे उतरलेल्या महिलेला पोलिसांनी वाचवलं, जबानीत म्हणाली, “मी तर…”
LokPoll Survey Results in Maharashtra
LokPoll Survey: महाराष्ट्रात लोकसभेची पुनरावृत्ती होणार; मविआला १४१ ते १५४ जागा, तर महायुतीला…
Goa, citizens Goa angry, Impact of tourism,
गोवेकर का चिडले आहेत? पर्यटनाचा कहर मुळावर उठला आहे का?
Who is Jaydeep Apte in Marathi
Jaydeep Apte : जयदीप आपटेला पोलिसांनी हाक मारली, रडत गयावया करु लागला आणि म्हणाला; “मला…”
Manu Bhaker's Father Statement on His Daughter and Neeraj Chopra Marriage Rumors
Manu Bhaker Neeraj Chopra: मनू भाकेर-नीरज चोप्राची सोयरीक जुळली? मनूच्या वडिलांनी केले मोठे वक्तव्य; म्हणाले, “नीरजला आम्ही…”

धर्मवीर, स्वराज्यरक्षक छत्रपती संभाजी महाराज मुंबई किनारी रस्ता (दक्षिण) प्रकल्पाचे ९१ टक्के काम पूर्ण झाले आहे. मरीन ड्राईव्ह ते वांद्रे वरळी सागरी सेतूपर्यंत हा मार्ग तयार करण्यात येत आहे. या प्रकल्पांतर्गत आतापर्यंत टप्प्याटप्याने मार्गिकांचे लोकार्पण करण्यात आले आहे. बिंदू माधव ठाकरे चौक ते प्रिन्सेस स्ट्रीटपर्यंत दक्षिण वाहिनी मार्गिका १२ मार्च २०२४ पासून वाहतुकीसाठी खुली करण्यात आली आहे. मरीन ड्राइव्ह ते हाजीअली उत्तर वाहिनी मार्गिका १० जूनपासून अंशतः खुली करण्यात आली. तसेच हाजी अली ते खान अब्दुल गफार खान मार्गपर्यंत उत्तर दिशेने जाणाऱ्या साधारण ३.५ कि. मी. मार्गिकेचे काम पूर्ण झाले असल्याने ती नागरिकांच्या सोयीकरिता तात्पुरत्या स्वरुपात ११ जुलैपासून खुली करण्यात आली आहे. मात्र मरीन ड्राईव्ह ते वांद्रे वरळी सेतूपर्यंतचा पूर्ण मार्ग सुरू करण्यासाठी डिसेंबर २०२४ चे उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे. पालिका आयुक्त भूषण गगराणी यांनी नुकतीच याबाबतची घोषणा केली.

आणखी वाचा-औषध खरेदीची निविदा प्रक्रिया वेगाने पूर्ण करावी, झीरो प्रिस्क्रिप्शन योजना सप्टेंबरपासून सुरु करण्याचे आदेश

वांद्रे वरळी सागरी सेतूसाठी प्रतीक्षा

सागरी किनारा मार्ग पुढे वांद्रे – वरळी सागरी सेतूला जोडण्यात येणार आहे. हा प्रकल्प वांद्रे – वरळी सागरी सेतूला जोडण्यासाठी दोन तुळई (बो स्ट्रींग आर्च स्ट्रिंग गर्डर) यशस्वीपणे स्थापन केल्यानंतर दोन्ही मार्गिकांच्या कामांना वेग देण्यात आला आहे. मात्र सागरी किनारा मार्ग आणि वांद्रे वरळी सागरी सेतूला जोडणाऱ्या पुलाची कामे अद्याप बाकी असल्यामुळे वाहनचालकांना अजून प्रतीक्षा करावी लागणार आहे. प्रकल्पातील आंतरमार्गिका, रस्ते, सागरी पदपथ आदी कामे अंतिम टप्प्यात आहेत.

आणखी वाचा-Mumbai Local : विरार एसी लोकलमधला धक्कादायक प्रकार, दंडाचे पैसे मागितल्याने शर्ट फाडत टीसीला मारहाण

हिरवळीच्या कामांसाठी निविदा प्रक्रिया

मुंबई किनारी रस्ता प्रकल्पातंर्गत निर्माण होणाऱ्या १११ हेक्टर जागेपैकी सुमारे ७० हेक्टर जागा हरित क्षेत्राकरिता उपलब्ध होणार आहे. या जागेमध्ये लँडस्केपिंग, उद्यान, सायकल मार्गिका, मनोरंजन क्षेत्र, खुले प्रेक्षागृह, पदपथ इत्यादी सुविधा विकसित करण्यात येणार आहेत. या कामाकरिता सल्लागारांची नेमणूक करण्यात आली असून, त्यांच्यामार्फत निविदा तयार करण्याचे काम प्रगतिपथावर आहे. तसेच या क्षेत्रालगत असलेले महालक्ष्मी रेसकोर्सचे अंदाजे ४८ हेक्टर क्षेत्र महानगरपालिकेस सेंट्रल पार्क विकसित करण्याकरिता प्राप्त झाले आहे. या कामाकरिता वास्तुविशारदांची नेमणूक करण्याचे काम प्रगतिपथावर आहे.