मुंबईत धावत्या लोकलमध्ये परीक्षेला निघालेल्या विद्यार्थिनीवर एका नराधमान अत्याचार केला, ही घटना अत्यंत संतापजनक आहे. गेल्या काही दिवसांत राज्यात महिलांवरील अत्याचारांमध्ये झालेली वाढ चिंताजनक आहे. या घटना महाराष्ट्राच्या गृह खात्याच्या कार्यक्षमतेवर प्रश्नचिन्ह निर्माण करणाऱ्या आहेत. अशा तीव्र शब्दात विधानसभेचे विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी संताप व्यक्त या घटनेचा निषेध केला आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

लोकलमध्ये झालेल्या बलात्काराच्या या घटनेचा युद्धपातळीवर तपास पूर्ण करुन सुरक्षा व्यवस्थेतील गंभीर हलगर्जीपणाची चौकशी करण्याची मागणी अजित पवार यांनी केली आहे.

मुंबईत लोकलच्या हार्बर मार्गावर धावत्या लोकलमध्ये सकाळच्या वेळेत विद्यार्थिनीवर अत्याचाराची घटना घडली. परीक्षेला जात असताना विद्यार्थीनीसोबत सकाळी साडे सातच्या सुमारास हा प्रकार घडला. गेल्या काही दिवसांत राज्यात महिलांवरील अत्याचाराच्या घटनांमध्ये झालेली वाढ चिंताजनक असून गृहखात्याच्या कार्यक्षमतेवर प्रश्नचिन्ह उपस्थित करणारी आहे. ही घटना घडली त्या लोकलच्या महिला डब्यांमध्ये पोलीस सुरक्षा व्यवस्था का नव्हती ? याला कोण जबाबदार आहे ? सुरक्षा व्यवस्था असती तर एका विद्यार्थिनीवरील हा गैरप्रसंग टाळता आला असता असेही अजित पवार म्हणाले.

नेमकी काय घडली घटना?

मुंबईत एका ४० वर्षीय व्यक्तीने लोकल ट्रेनमध्ये २० वर्षीय तरुणीवर बलात्कार केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. धावत्या मुंबई लोकल ट्रेनच्या लेडीज डब्यात आरोपीने मुलीवर बलात्कार केला. ही घटना बुधवारी सकाळी घडली. छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस (सीएसएमटी) मस्जिद बंदर स्थानकांदरम्यान सकाळी ७ वाजून २६ मिनिटांनी वाजता ही भयंकर घटना घडली. मिळालेल्या माहितीनुसार पीडित तरुणी एकटीच प्रवास करत होती, तिने आरडाओरडा सुरू केल्यानंतर आरोपीने पळ काढल्याचे समजतं आहे.

मुंबईतील गिरगाव येथील रहिवासी असलेली ही तरुणी नवी मुंबईतील बेलापूरच्या दिशेने जात होती. ती परीक्षा देण्यासाठी लोकलने प्रवास करत होती. सदर घटनेनंतर तरुणीने रेल्वे सुरक्षा दलाकडे (आरपीएफ) जाऊन तक्रार दाखल केली होती त्यानंतर पोलिसांनी अज्ञात व्यक्तीविरुद्ध गुन्हा दाखल केला.

Mumbai News (मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: The incident of rape of a female student in mumbai local raises a question mark on the efficiency of the home department said ajit pawar scj
Show comments