मुंबई: मुंबईत उद्या रविवारी दहा ठिकाणी ‘महा स्वच्छता अभियान’ उपक्रम राबविला जाणार आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या प्रमुख उपस्थितीत सकाळी ९ वाजता या महा स्वच्छता अभियानाला भारताचे प्रवेशद्वार अर्थात गेट वे ऑफ इंडिया येथून प्रारंभ होणार आहे. स्वच्छता कर्मचाऱ्यांकडून केली जाणारी स्वच्छता, संयंत्रांच्या सहाय्याने स्वच्छतेची प्रात्यक्षिके आणि स्थानिक लोकसहभाग असा सर्वांचा मेळ साधून ही महा स्वच्छता होणार आहे.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या आदेशानुसार मुंबई पालिकेद्वारे डिसेंबरच्या पहिल्या आठवड्यापासून मुंबईत ‘संपूर्ण स्वच्छता मोहीम’ राबवली जात आहे. दर आठवड्यात एक दिवस प्रत्‍येक परिमंडळातील एका प्रशासकीय विभागात (वॉर्ड) संपूर्ण स्‍वच्‍छता मोहीम (डीप क्लिनिंग ड्राइव्ह) राबविण्‍यात येत आहे. ही मोहीम महाराष्ट्रभर विस्तारण्याची घोषणा मुख्‍यमंत्र्यांनी नुकतीच केली होती. या पार्श्वभूमीवर, येत्‍या रविवारी म्हणजे ३१ डिसेंबर रोजी सकाळी ९ वाजेपासून मुंबईत दहा ठिकाणी महा स्‍वच्‍छता अभियान राबविण्यात येणार आहे.बृहन्मुंबई महानगरपालिकेने संपूर्ण स्वच्छता मोहीमेसाठी तयार केलेल्या प्रमाणित कार्यपद्धतीनुसार (एसओपी) या ठिकाणी मोहीम राबवली जाणार आहे.

Shortage of public toilets in Pune city
वानवा.. स्वच्छतागृहांची
12 December Rashi Bhavishya In Marathi
दुसरा गुरुवार, १२ डिसेंबर पंचांग: महालक्ष्मीच्या कृपेने मेषला…
Comprehensive sanitation campaign begins in slums in Thane
ठाण्यातील झोपडपट्ट्यांमध्ये सर्वंकष स्वच्छता मोहीमेला सुरूवात
kala lake, Kalyan, Indurani Jakhad, contractor Notice,
कल्याण : काळा तलाव साफसफाईत दिरंगाई करणाऱ्या ठेकेदाराला नोटीस, आयुक्त डॉ. इंदुराणी जाखड यांची कारवाई
mmrda and mmmocl provided clean toilets at all metro stations on Dahisar Andheri Metro 2A and Metro 7 routes
मेट्रो स्थानकांतील स्वच्छता सुधारणांसाठी ‘ॲप’ प्रवाशांच्या सूचना, तक्रारी जाणून घेण्यासाठी ‘एमएमएमओपीएल’चा पुढाकार
cleanliness drive slums Thane, Siddheshwar lake area,
ठाण्याच्या झोपडपट्ट्यांमध्ये आता सर्वंकष स्वच्छता मोहीम, शनिवारपासून सिद्धेश्वर तलाव परिसरातून उपक्रमाला सुरुवात
Mumbai Police Deploy in azad maidan for swearing-in
Maharashtra Government Formation : ५०० हून अधिक पोलीस तर साडेतीन हजार कॉन्स्टेबल, शपथविधीसाठी पोलिसांचा ‘असा’ असेल बंदोबस्त!
sukhbir badal akal takht punishment
सुखबीर बादल यांना सुवर्ण मंदिरात शौचालय आणि भांडी साफ करण्याचे आदेश; कारण काय?

हेही वाचा… मुंबई: शीव येथील लोकमान्य टिळक रुग्णालयात प्लास्टिक बॉटल क्रशिंग मशीन कार्यान्वित

यावेळी राज्‍याचे उप मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उप मुख्यमंत्री अजित पवार, शालेय शिक्षण व मराठी भाषा मंत्री तथा मुंबई शहर जिल्हा पालकमंत्री दीपक केसरकर, कौशल्य विकास, उद्योजकता व नाविन्यता विभाग मंत्री तथा मुंबई उपनगरे जिल्हा पालकमंत्री मंगल प्रभात लोढा यांच्यासह विविध लोकप्रतिनिधी यावेळी विशेष अतिथी म्हणून उपस्थित राहणार आहेत. महानगरपालिका आयुक्त तथा प्रशासक डॉ. इकबाल सिंह चहल, अतिरिक्त महानगरपालिका आयुक्त (पश्चिम उपनगरे) डॉ. सुधाकर शिंदे यांच्यासह सर्व संबंधित अधिकारी देखील यावेळी उपस्थित असतील.

महा स्वच्छता अभियान संदर्भात अतिरिक्‍त महानगरपालिका आयुक्‍त (पश्चिम उपनगरे) डॉ. सुधाकर शिंदे म्‍हणाले की, रविवारी होणाऱ्या महा स्वच्छता मोहीमेत सुमारे एक हजार गणवेशधारी स्वच्छता कर्मचारी आवश्यक त्या संसाधनांसह तसेच ई स्वीपर, पॉवर स्वीपर आदी संयंत्रांचे प्रात्यक्षिक सादर करतील. ही प्रात्यक्षिके व प्रत्यक्ष स्वच्छतेची एकूणच कार्यवाही महानगरपालिकेच्या समाजमाध्यमांवरुन थेट प्रक्षेपित करण्यात येतील. तसेच, बृहन्मुंबई महानगरपालिकेने तयार केलेली प्रमाणित कार्यपद्धती (एसओपी) राज्यातील सर्व स्थानिक स्वराज्य संस्थांपर्यंत पोहोचवली जाणार आहे. त्याआधारे त्या-त्या स्थानिक स्वराज्य संस्थांना सुयोग्य अशी स्वच्छता मोहीम राबवता येईल. एकूणच, बृहन्मुंबई महानगरपालिकेची ही मोहीम राज्यातील सर्व स्थानिक स्वराज्य संस्थांसाठी मार्गदर्शक स्वरुपाची ठरणार आहे, असे डॉ. शिंदे यांनी नमूद केले.

हेही वाचा… नवीन वर्षाच्या पार्श्‍वभूमीवर मुंबई पोलिसांचे ऑल आऊट ऑपरेशन; २३ फरार आणि वॉन्टेड आरोपींना पोलिसांकडून अटक

लोकप्रतिनिधींसह शालेय विद्यार्थी, महाविद्यालयीन तरुण, स्काऊट व गाईड, राष्ट्रीय छात्र सेना (एनसीसी), स्वयंसेवी संस्था, ख्यातनाम व्यक्ती व समाजातील सर्व भागधारक, स्थानिक नागरिक यांनी या मोहिमेत सहभागी झाले पाहिजे, यासाठी महानगरपालिकेने पुढाकार घेतला आहे, अशी माहिती देखील अतिरिक्त महानगरपालिका आयुक्त डॉ. शिंदे यांनी दिली.

इथे होणार स्वच्छता

  • गेट वे ऑफ इंडिया, चर्चगेट (ए विभाग)
  • वीरमाता जिजाबाई भोसले वनस्पती व उद्यान प्राणिसंग्रहालय, भायखळा (ई विभाग)
  • सदाकांत ढवण मैदान, परेल (एफ दक्षिण)
  • वांद्रे रेल्वे स्थानक पश्चिम (एच पश्चिम विभाग)
  • वेसावे (वर्सोवा) चौपाटी, अंधेरी (के पश्चिम विभाग)
  • बांगूर नगर, गोरेगाव (पी दक्षिण विभाग)
  • सावरकर मैदान, कुर्ला पूर्व (एल विभाग)
  • अमरनाथ उद्यान, देवनार (एम पूर्व विभाग)
  • डी मार्ट जंक्‍शन, हिरानंदानी संकूल, भांडूप (एस विभाग)
  • ठाकूर गाव , कांदिवली (आर दक्षिण विभाग)

Story img Loader