मुंबई : लोकसभा निवडणुकीत राज्यात ३० जागा जिंकणाऱ्या महाविकास आघाडीने १५० पेक्षा अधिक विधानसभेच्या जागांवर आघाडी घेतली असून, महायुती १२५ जागांवर आघाडीवर आहे. आगामी विधानसभा निवडणुकीच्या दृष्टीने हा कल सत्ताधारी महायुतीसाठी धोक्याचा इशारा मानला जातो.

राज्यातील प्रत्येक लोकसभा मतदारसंघात सहा विधानसभा मतदारसंघांचा समावेश होतो. राज्यातील लोकसभेच्या ४८ मतदारसंघांची २८८ मतदारसंघांमध्ये विभागणी होते. लोकसभा निवडणुकीत राज्यात महाविकास आघाडीचे ३०, महायुतीचे १७ तर एक अपक्ष निवडून आला आहे. राज्यात पुढील चार महिन्यांतच विधानसभेची निवडणूक आहे. भाजपने राज्यात २८ जागा लढविल्या होत्या.

राज्यात लढविलेल्या जागा आणि मिळालेले यश याची तुलना करता राष्ट्रवादी शरद पवार गट आणि काँग्रेसने चांगली कामगिरी केली. महाविकास आघाडीत जागावाटप हा कळीचा मुद्दा असेल. त्यातच लोकसभेत चांगले यश मिळाल्याने महाविकास आघाडीत उमेदवारीसाठी आता इच्छूकांची संख्या वाढण्याची शक्यता आहे.

हेही वाचा >>>मुंबई महानगरपालिकेचा पहिला वातावरणीय अर्थसंकल्प अहवाल सादर, अर्थसंकल्पतील भांडवली खर्चाच्या ३२ टक्के तरतुदी वातावरण कृती आराखड्यासाठी

मतांची टक्केवारी

काँग्रेस १३ जागा १६.९२

भाजप ९ जागा २६.१८

शिवसेना (उबाठा) ९ जागा १६.७२

राष्ट्रवादी (शरद पवार) ८ जागा १०.२७

शिवसेना (शिंदे) ७ जागा १२.९५

राष्ट्रवादी (अजित पवार) १ जागा ३.६०