मुंबई : करोनाकाळातील भयाण वास्तवावर भाष्य करणाऱ्या ‘अनलॉक जिंदगी’ या चित्रपटाने प्रदर्शनापूर्वीच राष्ट्रीय – आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवांमध्ये आपली मोहोर उमटवली आहे. काही दिवसांपूर्वीच या चित्रपटाचा रोमांचकारी ट्रेलर प्रदर्शित झाला होता. ‘अनलॉक जिंदगी’ या चित्रपटाने आतापर्यंत शिकागो, टोरांटो, पिनॅकल, मेक्सिको, पॅरिस, न्यूयॉर्क, मिलान, लंडन आणि १३ ‌‌व्या दादासाहेब फाळके फिल्म फेस्टिवल आदी राष्ट्रीय, आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवांमध्ये नामांकने मिळवली असून मिलान फिल्म अवॉर्ड्समध्ये ‘बेस्ट नरेटिव्ह फिचर फिल्म’ आणि पिनॅकल फिल्म अवॉर्ड्समध्ये ‘बेस्ट फिचर फिल्म’ या २ पुरस्काराने या चित्रपटाला सन्मानीत करण्यात आले आहे.

‘अनलॉक जिंदगी’ ठरला नऊ राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय पुरस्कारांचा मानकरी

‘अनलॉक जिंदगी’ या चित्रपटाची कथा माणसाचे मतपरिवर्तन करणारी असून हा चित्रपट पाहताना प्रेक्षकांना अनेक गोष्टी त्यांच्या आयुष्याशी समरूप वाटतील, असे मत या चित्रपटाचे निर्माते, दिग्दर्शक राजेश गुप्ता यांनी व्यक्त केले. रियल रील्स प्रस्तुत या चित्रपटाचे निर्माते आणि दिग्दर्शक राजेश गुप्ता असून या चित्रपटात पितोबाश त्रिपाठी, राजेश गुप्ता, देविका दफ्तरदार, शिवानी सुर्वे, इंदिरा कृष्णा, हेमल देव यांनी प्रमुख भूमिका साकारल्या आहेत. या चित्रपटाचे लेखन आणि संवाद लेखनही राजेश गुप्ता यांनी केले असून १९ मे रोजी ‘अनलॉक जिंदगी’ महाराष्ट्रभरात प्रदर्शित होणार आहे.

Traditional Outfit Ideas to Dress for Ganesh Chaturthi 2024
नावीन्यपूर्ण परंपरा
15th September Rashi Bhavishya & Marathi Panchang
१५ सप्टेंबर पंचांग: आनंदाची वार्ता ते प्रेम, मैत्रीची साथ; १२ पैकी कोणत्या राशीचा हसत-खेळत जाणार रविवार; वाचा तुमचे राशिभविष्य
Sarbanand Sonowal asserts that the port is an attraction for the world
वाढवण बंदर जगासाठी आकर्षणबिंदू -सोनोवाल
Rehana Sultan, cardiac surgery, cardiac surgery on Rehana sultan,Rohit Shetty Javed akhtar gave financial support Rehana
राष्ट्रीय पुरस्कार विजेत्या ज्येष्ठ अभिनेत्रीची प्रकृती बिघडली, आर्थिक मदतीसाठी बॉलीवूडमधील ‘हे’ लोक मदतीला आले धावून
President Draupadi Murmu on Maharashtra tour
राष्ट्रपती मुर्मू आजपासून महाराष्ट्र दौऱ्यावर
National awards teachers, awards teachers maharashtra,
राज्यातील दोन शिक्षकांना राष्ट्रीय पुरस्कार, कोण आहेत मानकरी?
Mardaani 3 Movie Announcement
राणी मुखर्जीच्या ‘मर्दानी ३’ चित्रपटाची घोषणा
Composer Avadhoot Gupte visit to Malgaon High School
चित्रपट निर्माते, दिग्दर्शक, संगीतकार अवधूत गुप्ते यांची आजोळच्या मळगाव हायस्कूलला भेट