मुंबई : मुंबई महानगरपालिकेने चेंबूर (पूर्व) येथील म्‍हैसूर कॉलनी परिसरातील शरद नारायण आचार्य उद्यानामध्‍ये मियावाकी पद्धतीने शहरी जंगल तयार करण्याचे ठरवले आहे. दोन हजार ५०० चौरस मीटर क्षेत्रामध्ये ४८ देशी प्रजातीच्या १० हजार २६४ रोपांची लागवड करण्यात येणार आहे. हा उपक्रम नुकताच हाती घेण्यात आला आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

मुंबईतील हरित क्षेत्र वाढवण्यासाठी विविध ठिकाणी टप्प्याटप्प्याने मियावाकी पद्धतीच्या नागरी वनांची महानगरपालिकेतर्फे लागवड करण्यात येत आहे. त्याचाच एक भाग म्हणून ‘एम – पश्चिम’ विभागातील चेंबूर (पूर्व) येथील म्‍हैसूर कॉलनी परिसरातील शरद नारायण आचार्य उद्यानामध्‍ये आयआयएफएल फाऊंडेशनच्या सामाजिक दायित्व निधीतून दोन हजार ५०० चौरस मीटर क्षेत्रामध्ये ४८ देशी प्रजातीच्या १० हजार २६४ रोपांची लागवड करण्यात येणार आहे. या उपक्रमाला अतिरिक्त महानगरपालिका आयुक्त (पूर्व उपनगरे) आश्विनी भिडे यांच्‍या हस्‍ते सोमवारी सुरुवात करण्‍यात आली.

हेही वाचा >>>मुंबई: आणखी मोठ्या घरासाठी बीडीडीतील रहिवाशांचा आज ‘वर्षा’वर मोर्चा

चेंबूरमधील शरद नारायण आचार्य उद्यानात करण्‍यात आलेल्‍या वृक्षारोपणात देशी प्रजातींच्‍या वृक्षांचा म्‍हणजेच फळझाडे, फुलझाडे, औषधी गुणधर्म असणाऱ्या वृक्षांचा समावेश आहे. यात प्रामुख्याने चिंच, पळस, करंज, बेहडा, सावर, रतनगुंज, साग, सीताफळ, बेल, पारिजातक, कडूनिंब, बांबू, पेरू, पुत्रजीवा, सीता अशोक, हरडा, खैर, जांभूळ, मोह, बहावा, सुरू, बदाम, रिठा, शीसम, बकुळ, अर्जुन, फणस, आवळा, कदंब यांसारख्या विविध प्रकारच्या झाडांचा समावेश आहे.

Mumbai News (मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: The mumbai municipal corporation has decided to create an urban forest in the miyawaki style in the mysore colony chembur mumbai print news amy