मुंबईः नवीन वर्षाच्या पूर्वसंध्येच्या जल्लोषात विघ्न येऊ नये यासाठी मुंबई पोलिसांनी शहरात शुक्रवारी रात्री उशिरा ऑल आऊट ऑपरेशन मोहीम राबवली. या कारवाईत पोलिसांनी २३ फरार आणि वॉन्टेड आरोपींना अटक केले. २१७ ठिकाणी कोंबिग ऑपरेशन करण्यात आले तर ७९६४ वाहनांची तपासणी करण्यात आली. त्यात विना हेल्मेट दुचाकी चालवणाऱ्या १८०७ जणांवर, तर १३५५ चालकांवर मोटर वाहन कायद्या अंतर्गत कारवाई करण्यात आली. यावेळी ६३ मद्यपी चालकांवरही कारवाई करण्यात आल्याची माहिती पोलिसांनी दिली.
सरत्या वर्षांला निरोप देताना तसेच नवीन वर्षांचे स्वागत करण्यासाठी एकीकडे मुंबईकर सज्ज झाले असताना मुंबई पोलिसांनी शहरात कडेकोट पोलीस बंदोबस्त तैनात केला आहे. शहरात कोणताही अनुचीत प्रकार घडू नये, म्हणून मुंबई पोलिसांनी शुक्रवारी रात्री अकरा वाजता अचानक ऑल आऊट ऑपरेशन मोहीम सुरु केली. रात्री तीन वाजेपर्यंत ते ऑपरेशन सुरू होते. त्यावेळी पाच प्रादेशिक विभागाचे अतिरिक्त पोलीस आयुक्त, तेरा पोलीस उपायुक्त, ४१ सहाय्यक पोलीस आयुक्त आणि ९३ पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस ठाण्यातील पोलीस अधिकारी आणि कर्मचार्यांनी आपल्या हद्दीत विशेष मोहीम हाती घेतली होती. पोलीस आयुक्त विवेक फणसळकर, सहपोलीस आयुक्त सत्यनारायण चौधरी यांनी पोलीस ठाणे, नाकाबंदी आणि कोम्बिंग ऑपरेशनदरम्यान विविध ठिकाणी भेट देऊन पोलिसांना मार्गदर्शन केले.
हेही वाचा… मुंबईवर धुरक्याचे सावट
या कारवाईदरम्यान अभिलेखावरील वॉन्टेड व फरार असलेले एकूण ८८७ आरोपी तपासण्यात आले, त्यात २३ आरोपी विविध गुन्ह्यांत फरार आणि विविध गुन्ह्यांत आरोपी असलेल्यांना अटक करण्यात आली. अजामिनपात्र वॉरंट बजावून ७७ जणांना तसेच एनडीपीएस कलमांतर्गत १०४ जणांना अटक करण्यात आली. महिलांविरोधातील गुन्हे, तसेच गंभीर गुन्ह्यांतील ३१ आरोपींवर प्रतिबंधात्मक कारवाई करण्यात आली. सराईत चोरांच्या टोळीविरोधात दोन कारवाया करण्यात आल्या. अवैध शस्त्रे बाळगल्याप्रकरणी ४९ जणांवर कारवाई करुन त्यांच्याकडील शस्त्रे जप्त करण्यात आले. सर्व पोलीस ठाण्याच्या हद्दीत २१७ ठिकाणी कोम्बिंग ऑपरेशन करवण्यात आले. अवैध दारू विक्रीची ९५ ठिकाणे व जुगाराच्या अड्ड्यावर छापे टाकण्यात आले. त्यात ६३ जणांना अटक करण्यात आली. तडीपार करण्यात आलेल्या ५० आरोपींना बेकायदेशिरपणे शहरात राहत असल्याच्या आरोपाखाली अटक करण्यात आली. या प्रकरणी एकूण १२३ जणांवर तसेच २६४ फेरीवाल्यांवर कारवाई करण्यात आली. तसेच अभिलेखावरील ६१६ आरोपी तपासण्यात आलेऊ त्यातील ९० आरोपी मिळून आले. त्यांच्यावर प्रतिबंधात्मक कारवाई करण्यात आली.
सर्व पोलीस ठाण्याच्या हद्दीत ११२ ठिकाणी नाकाबंदी लावण्यात आली होती. त्यात ७९६४ दुचाकी आणि चारचाकी वाहने तपासण्यात आली, यावेळी मोटार वाहन कायदा कलमांतर्गत १३५५ चालकांवर कारवाई करण्यात आली. विना हेल्मेट दुचाकी चालवणाऱ्या १८०६ जणांवर तर ६३ मद्यपी चालकांवर कारवाई करण्यात आली. बेकायदेशीर वास्तव्य करणार्या प्रतिबंधात्मक कारवाईच्या अनुषंगाने ८८६ हॉटेल, लॉजेस आणि मुसाफिरखाने तपासण्यात आले. ५४८ संवेदनशील आशा क तपासणी करण्यात आल्याचे पोलिसांनी सांगितले.