मुंबईकरांना जलतरणाचा आनंद घेता यावा यासाठी मुंबई महानगरपालिकेने मुंबईत आणखी सात ठिकाणी जलतरण तलाव बांधण्याचा निर्णय घेतला आहे. सध्या महानगरपालिकेचे सहा तलाव कार्यान्वित असून लवकरच आणखी सात तलावांचे लोकार्पण करण्यात येण्याची शक्यता आहे. भविष्यात चार तलाव पश्चिम उपनगरात, दोन शहरात, तर एक पूर्व उपनगरात बांधण्यात येणार आहेत.

हेही वाचा- ३१ डिसेंबरला दारू पिऊन गाडी चालवल्यास भरावा लागेल ‘इतका’ दंड; जाणून घ्या ‘ड्रिंक अँड ड्राइव्ह’चे नियम

Thane district water, MIDC, MIDC water scheme ,
ठाणे जिल्ह्याचे पाणी महागणार ? एमआयडीसीची पाणी योजना तोट्यात, दर वाढवण्याच्या हालचाली
Sharmistha Mukherjee with her father Pranab Mukherjee
Sharmistha Mukherjee: ‘बाबांच्या निधनानंतर काँग्रेसने साधी शोकसभाही घेतली…
Will water supply in Wardha remain shut indefinitely
वर्ध्यात पाण्यासाठी हाहा:कार! पाणीपुरवठा बेमुदत बंद राहणार ?
big step by pune municipality to solve water problem in included villages
समाविष्ट गावातीत पाणी प्रश्न सोडवण्यासाठी पालिकेचे मोठे पाऊल !
Raigad district Alibaug favorite tourist destination
डेस्टिनेशन अलिबाग!… रायगड जिल्हा पर्यटकांचे आवडते ठिकाण का बनले आहे? शेती, मासेमारीपेक्षा पर्यटनात अधिक रोजगारनिर्मिती?
almatti dam flood
कर्नाटकच्या कृष्णाकाठ योजनेमुळे पश्चिम महाराष्ट्राला महापुराचा धोका
Ganesh Naik Minister post , Navi Mumbai water,
गणेश नाईकांच्या मंत्रिपदामुळे शहराला वाढीव पाण्याची आस, बारवी धरणाचे पाणी मिळण्याची आशा बळावली
Wetlands Navi Mumbai , Wetlands,
२२ पाणथळ जागांचे भवितव्य अहवालबंद

मुंबई महानगरपालिकेचे एकूण सहा तरण तलाव सध्या कार्यान्वित आहेत. त्यापैकी दादर, कांदिवली, दहिसर आणि चेंबूर येथील तरण तलावाचे व्यवस्थापन मुंबई महानगरपालिकेमार्फत करण्यात येत आहे. तर मुलुंड येथील प्रियदर्शिनी क्रीडा संकुल आणि अंधेरी येथील शहाजीराजे भोसले क्रीडा संकुल येथील जलतरण तलाव एका संस्थेला चालवण्यासाठी देण्यात आलेले आहेत. या तलावांचे सदस्यत्व मिळविण्यासाठी अनेक नागरिक प्रयत्न करीत आहेत. नागरिकांची मागणी लक्षात घेऊन मुंबईत आणखी सात ठिकाणी तरण तलाव बांधण्याचा निर्णय महानगरपालिकेने घेतला आहे.

हेही वाचा- मुंबई : अंधेरी येथे वानराच्या हल्ल्यात एक व्यक्ती गंभीर जखमी

कुठे होणार तलाव

दहिसर (पश्चिम) येथील कांदरपाडा जलतरण तलाव, मालाड (पश्चिम) येथील चाचा नेहरू मैदान जलतरण तलाव, अंधेरी (पश्चिम) येथील गिल्बर्ट हिल जलतरण तलाव, अंधेरी (पूर्व) येथील कोंडिविटा गाव जलतरण तलाव, वरळी येथील वरळी जलाशय टेकडी जलतरण तलाव, विक्रोळी (पूर्व) येथील टागोर नगर जलतरण तलाव आणि वडाळा येथील वडाळा अग्निशमन केंद्र जलतरण तलाव या सात ठिकाणी नवीन जलतरण तलाव विकसित करण्यात येणार आहेत. यापैकी वडाळा येथील अग्निशमन केंद्रातील जलतरण तलाव हा सध्या अग्निशमन केंद्राच्या अखत्यारित असून येत्या काळात नूतनीकरण करून तो नागरिकांसाठी खुला करण्यात येणार आहे.

हेही वाचा- मुंबईः माऊंटमेरी चर्चवर लष्कर-ए-तैय्यबाकडून हल्ल्याचा ई-मेल

सध्या कार्यान्वित असलेल्या चार तरण तलावांची सभासद संख्या वाढवण्यात आली आहे. दादर पश्चिम परिसरातील महात्मा गांधी स्मारक ऑलिम्पिक जलतरण तलाव यासाठी ७०० वार्षिक सभासद व ८२५ त्रैमासिक सभासद, चेंबूर पूर्व परिसरातील जनरल अरुणकुमार वैद्य ऑलिम्पिक जलतरण तलाव यासाठी ३५० वार्षिक सभासद व ५५० त्रैमासिक सभासद, दहिसर पूर्व परिसरातील श्री मुरबाळीदेवी जलतरण तलाव यासाठी ३३० वार्षिक सभासद व २७५ त्रैमासिक सभासद आणि कांदिवली पश्चिम परिसरातील सरदार वल्लभभाई पटेल ऑलिम्पिक जलतरण तलाव यासाठी २,१७८ वार्षिक सभासद व ५५० त्रैमासिक सभासद इतक्या ऑनलाईन सभासदत्वासाठी ३ जानेवारीपासून ऑनलाईन सदस्यत्व नोंदणी सुरू होणार आहे.

Story img Loader