मुंबई : धारावीत परिसरात महानगरपालिकेच्या ‘जी उत्तर’ विभाग कार्यालयाने मंगळवारी तोडक कारवाई केली. यावेळी पालिकेच्या पथकाने दहा झोपडीवजा दुकाने हटवली. यावेळी नागरिक आणि पालिकेचे अधिकारी, कामगार यांच्यात वादावादी झाली.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip

धारावी परिसरात शीव – वांद्रे जोड रस्त्यावर वाय जंक्शन परिसरात मंगळवारी पालिकेच्या पथकाने तोडक कारवाई केली. या कारवाईत दहा दुकाने हटवण्यात आली. कोणतीही नोटीस न देता पालिकेने ही कारवाई केल्याचे येथील नागरिकांचे म्हणणे आहे. ही कारवाई सुरू असताना नागरिक, दुकानदारांनी पालिकेच्या पथकाला विरोध केला. पालिकेच्या पथकातील अधिकारी – कर्मचाऱ्यांसोबत दुकानदारांनी वाद घातला, मारहाणही झाल्याचे प्रत्यक्ष दर्शींनी सांगितले.

हेही वाचा >>>मुंबई : वाहन चोरीप्रकरणी मध्य प्रदेशातून दोघांना अटक

दरम्यान, कारवाईपूर्वी दुकानदारांना नोटीस देण्यात आली होती, असे ‘जी उत्तर’ विभागातील अधिकाऱ्यांनी सांगितले. तसेच ही दुकाने मोठ्या प्रमाणावर रस्ता व्यापत असल्यामुळे कारवाई केल्याचे त्यांनी सांगितले. या दुकानापैकी एक गॅरेज होते, त्याच्या गाड्या रस्ता व्यापत होत्या. तसेच एका दुकानाचे सिमेंट कॉंक्रिटचे सामानही रस्त्यावर होते. त्यामुळे पादचाऱ्यांना त्रास होत होता. म्हणून ही कारवाई करण्यात आल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले.