अमली पदार्थ विरोधी पथकाने मुंबईतील एक क्रूझवर केलेल्या धडाकेबाज कारवाईची सध्या सर्वत्र जोरदार चर्चा सुरू आहे. मुंबईच्या समुद्रात क्रूझवर सुरु असलेल्या एका रेव्ह पार्टीवर धाड टाकत एनसीबीच्या अधिकाऱ्यांनी आठ जणांना ताब्यात घेतलं आहे. शिवाय, मोठ्या प्रमाणात ड्रग्जदेखील जप्त करण्यात आलं आहे. विशेष बाब म्हणजे ताब्यात घेण्यात आलेल्यांमध्ये सुपरस्टार शाहरूख खानचा मुलगा आर्यन खान असल्याची देखील माहिती समोर आली आहे, तसेच दिल्लीमधील देखील काहीजण असल्याचे सांगण्यात आले आहे. तर, याबाबत एनसीबी प्रमुख एस.एन.प्रधान यांनी याप्रकरणी एनसीबीची भूमिका काय असणार हे स्पष्टपणे सांगितलं आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

“अमली पदार्थ विरोधी पथक (एनसीबी) प्रमुख एस.एन.प्रधान म्हणाले की, ताब्यात घेण्यात आलेल्यांपैकी सुपस्टारचा मुलगा आहे की नाही आहे, याच्याशी आम्हाला काही देणं घेणं नाही. आम्ही हे तपासत आहोत की यापैकी ड्रग्जशी कोण जुडलेले आहेत आणि जे ड्रग्जशी जुडलेले असतील, मग ते कुणाचाही मुलं असोत, कोणत्याही पदावरील असो त्यांच्यावर कारवाई होणारच. अनेक दिवसांपासून आम्हाला थोडीफार माहिती मिळत होती, मात्र जेव्हा खात्रीशीर माहिती मिळाली तेव्हा त्या क्रूझवर कारवाई केली गेली.” एबीपी न्यूजला दिलेल्या विशेष ते मुलाखतीत बोलत होते.

Mumbai Rave Party: आर्यन खानला ताब्यात घेतल्यानंतर समीर वानखेडेंची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले…

तसेच, “माहिती मिळाल्यानंतर आमचे २२ अधिकारी व कर्मचारी प्रवासी म्हणून क्रुझवर दाखल झाले. त्यानंतर जेव्हा क्रूझ निघणार होती, तेव्हा छापा मारला गेला. जे कुणी ड्रग्जशी जुडलेले आढळून आले त्यांना ताब्यात घेतलं गेलं. लपून ड्रॅग्ज नेली जात होती. छापा मारल्यानंतर देखील ड्रग्ज दडवण्याचा तर, काही जणांनी ते फेकण्याचा देखील प्रयत्न केला. आम्हाला मिळालेली माहिती बरोबर असल्याने कारवाई यशस्वी झाली.” अशी देखील माहिती त्यांनी दिली.

मुंबईतील रेव्ह पार्टी प्रकरणी शाहरुख खानचा मुलगा आर्यन खान एनसीबीच्या ताब्यात

याचबरोबर, “आतापर्यंत आठ जणांची यादी एनसीबीने जाहीर केली आहे. यामध्ये निश्चतपणे दिल्लीमधील देखील काहीजण आहेत. यावर सध्या कारवाई सुरू आहे, त्या लोकांची चौकशी सध्या सुरू आहे. त्यांच्याकडून मिळणाऱ्या माहितीप्रमाणे पुढील कारवाई होईल.” असं अमली पदार्थ विरोधी पथक (एनसीबी) प्रमुख एस.एन.प्रधान यांनी सांगितलं.

Mumbai News (मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: The ncb will take action against those involved in drugs s n pradhan msr