मढ येथे पावसाळ्यापूर्वी बांधण्यात आलेली पर्जन्य जलवाहिनी अवघ्या चार महिन्यात ढासळली असून सिमेंट काँक्रिटची पर्जन्य जलवाहिनी ढासळल्यामुळे संबंधित विभागाला हे बांधकाम तोडून टाकावे लागले आहे. या पर्जन्य जलवाहिनीच्या कामाबाबत प्रश्नचिन्ह उपस्थित झाले असून या प्रकरणी चौकशी करण्याची मागणी होऊ लागली आहे.

हेही वाचा- एमबीबीएस पदवी रद्द करण्यास नकार; खोट्या जात प्रमाणपत्रावर प्रवेश घेणाऱ्या डॉक्टरला उच्च न्यायालयाचा दिलासा

The work on six water tanks of Pune Municipal Corporation is still not complete Pune print news
सहा टाक्या, तरी पाणी मिळेना! पुण्यातील प्रकार
micro retierment
‘मायक्रो-रिटायरमेंट’ म्हणजे काय? तरुणांमध्ये का वाढतोय हा ट्रेंड?
Air quality in Borivali and Malad is dangerous
बोरिवली, मालाडची हवा धोकादायक, महिन्यातील जवळपास वीस दिवस बहुतेक भागांत वाईट हवेची नोंद
BMC chief inspects development works in Borivali
विकासकामांच्या गुणवत्तेवर अधिक भर द्यावा; पालिका आयुक्त भूषण गगराणी यांचे अधिकाऱ्यांना आदेश
Two arrested in conspiracy to murder Ambernath MLA Dr Balaji Kinikar thane news
शिवसेना आमदाराच्या हत्येचा कट ? अंबरनाथचे आमदार डॉ. बालाजी किणीकर यांच्या हत्येचा कटात दोघे अटकेत
Navy speed boat, Boat accident Mumbai ,
विश्लेषण : भारताचे ‘टायटॅनिक’! ७७ वर्षांपूर्वी मुंबईजवळ रामदास दुर्घटना कशी घडली? किती भीषण? अजूनही बोट सुरक्षा वाऱ्यावर का?
indonesia tsunami 2004 (1)
दोन लाखांहून अधिक जणांचा बळी घेणाऱ्या ‘त्या’ विध्वंसाने त्सुनामीचा पूर्वइशारा देणारी प्रणाली कशी बदलली?
20 years after Indian Ocean tsunami
Indian Ocean Tsunami: २००४ च्या त्सुनामीची भीषणता २० वर्षांनी काय शिकवून गेली?

मढ परिसरात पावसाचे पाणी वाहून नेण्यासाठी मे २०२२ मध्ये सिमेंट काँक्रिटची पर्जन्य जलवाहिनी नव्याने बांधण्यात आली होती. या वाहिनीचा बराचसा भाग पावसाळ्यात ढासळला. त्यामुळे रहिवाशांनी संताप व्यक्त केला होता. त्यानंतर पर्जन्य जलवाहिनी विभागाने या वाहिनीची दुरुस्ती केली होती. मात्र आता ही पर्जन्य जलवाहिनी पूर्णतः तोडून टाकण्यात येणार आहे.

हेही वाचा- ‘गिरणी कामगारांच्या घरांच्या प्रश्नासाठी लवकरच संयुक्त बैठक’; सरकारचे आंदोलनकर्त्या कामगारांना आश्वासन

या प्रकरणात मोठ्या प्रमाणावर पैशांचा अपव्यय झाला असून बांधकामाच्या दर्जावरही प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे. परिणामी, या प्रकरणाची चौकशी करावी, अशी मागणी वाचडॉग फाऊंडेशन या संस्थेने केली आहे. कंत्राटदारावर कारवाई करावी, तसेच त्याची देयके थांबवावी, देयके अदा केली असतील तर पैसे वसूल करावे, अशी मागणी फाउंडेशनचे पिमेंटा गोडफ्रे यांनी केली आहे. तसेच या प्रकरणाची चौकशी करून संबंधितांवर कठोर कारवाई करावी, अशी मागणीही त्यांनी केली आहे.

Story img Loader