मुंबई : महारेराकडून २०२३ मधील व्यवगत प्रकल्पांची (लॅप्स प्रोजेक्ट) यादी आपल्या संकेतस्थळावर जाहीर केली आहे. यादीनुसार आतापर्यंत   राज्यातील १७०२ प्रकल्प व्यपगत म्हणून घोषित झाले आहेत. तर आता एकूण व्यपगत प्रकल्पांची संख्या सहा हजारांच्या घरात गेली आहे. रेरा कायद्यानुसार नोंदणीकृत गृहप्रकल्प विहित मुदतीत पूर्ण करणे बंनधकारक आहे. या विहित मुदतीत प्रकल्प पूर्ण करता आला नाही तर नियमानुसार विकासकाला महारेराकडून मुदतवाढ घेता येते.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

अशी महत्त्वपूर्ण तरतुदी असतानाही अनेक विकासकांकडून विहित मुदतीत प्रकल्प पूर्ण केले जात नसून मुदतवाढही घेतली जात नाही. या पार्श्वभूमी प्रकल्प वेळेत पूर्ण न करता ग्राहकांना वेठीस घरणाऱ्या  विकसकांना महारेराने दणका देण्यास सुरूवात केली आहे. अशा प्रकल्पांना महारेराकडून व्यपगत (लॅप्स प्रोजेक्ट) प्रकल्पात समाविष्ट करण्यात येत आहे. तर या यादीत समाविष्ट प्रकल्पांना आता संबंधित प्रकल्पातील घरे विकता येत नाहीत, घरांची जाहिरात करता येत नाही. तसेच प्रकल्पाचे काम सुरु करता येत नाही. त्यानुसार महारेराने २०१७ पासून २०२२ पर्यंतची व्यपगत प्रकल्पांची यादी जाहीर केली असून एकूण व्यपगत प्रकल्पांची संख्या ४५०० घरात आहे.

हेही वाचा >>> वाढत्या उकाडय़ामुळे उष्माघाताचा धोका; तापमानाचा पारा ३६ अंश सेल्सिअसपर्यंत

राज्यातील एकूण व्यपगत प्रकल्पांची संख्या आता वाढली असून ती सहा हजाराच्या घरात गेली आहे. महारेराने नुकतीच २०२३ मधील व्यपगत प्रकल्पांची यादी जाहीर केली असून यात १७०२ प्रकल्पांचा समावेश आहे. यात मुंबई, ठाणे, नवी मुंबई, पुणे, नाशिक, नागपूर, छ. संभाजी नगर येथील प्रकल्पांचा समावेश आहे. नवीन घर घेणाऱ्यांनी महारेराच्या संकेतस्थळावरील ही यादी तपासून घर घेणे आवश्यक आहे. अन्यथा त्यांची फसवणूक होण्याची शक्यता आहे.