मुंबई : महायुतीमध्ये सरकार स्थापण्याबाबतची चर्चा थंडावली असली तरी येत्या गुरुवारी म्हणजे ५ डिसेंबरला नवीन सरकारचा शपथविधी पार पडेल, असे भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी शनिवारी जाहीर केले. खातेवाटप आणि मंत्र्यांची संख्या यावर तिन्ही घटक पक्षांच्या नेत्यांमध्ये सोमवारनंतरच चर्चा केली जाणार आहे. भाजपकडून काही नवीन चेहऱ्यांना मंत्रिमंडळात संधी दिली जाण्याची चिन्हे आहेत.
देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखालील शपथविधीचा मुहूर्त अखेर ठरला असून ५ डिसेंबरला सायंकाळी पाच वाजता मुंबईत आझाद मैदानात शपथविधी समारंभ होणार आहे. नवे सरकार देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली स्थापन होणार असून भाजप पक्षश्रेष्ठींनी त्यांच्या नावावर शिक्कामोर्तब केले आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी, केंद्रीय गृहमंत्री अमित शहा, संरक्षण मंत्री राजनाथ सिंह, भाजप अध्यक्ष नड्डा,केंद्रीय मंत्री नितीन गडकरी, उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्यासह भाजपशासित राज्यांचे मुख्यमंत्री, एनडीएतील घटक पक्षांचे नेते, संत, महंत व धर्मगुरू हे शपथविधी समारंभास उपस्थित राहतील.
हेही वाचा >>>संपादित जमिनीची उर्वरित भरपाई जमीन मालकाला द्या, उच्च न्यायालयाचे राज्य सरकारला आदेश
फडणवीस यांच्या नावावर पक्षश्रेष्ठींनी शिक्कामोर्तब केल्याने भाजप विधिमंडळ पक्षाची नेतानिवडीची बैठक ३ किंवा ४ डिसेंबरला विधान भवनात घेण्याचा प्रस्ताव आहे. त्यामुळे राज्यभरातून येणाऱ्या आमदारांना बैठक व शपथविधी समारंभास हजर राहणे सोयीचे होईल. बावनकुळे यांनी शपथविधी समारंभास राज्यभरातील कार्यकर्त्यांना मुंबईत येण्याच्या आणि त्यादिवशी राज्यभरात जल्लोष करण्याच्या सूचना दिल्या आहेत. या समारंभाच्या व जल्लोषाच्या तयारीसाठी त्यांनी आमदार व पदाधिकाऱ्यांची बैठकही घेतली. भाजपने राज्यभरातून सुमारे १५ हजार कार्यकर्त्यांना येण्यासाठी नियोजन केले आहे.
पहिल्या टप्प्यात २५ ते २७ मंत्री?
पहिल्या टप्प्यात २५-२७ मंत्र्यांचा समावेश होण्याची शक्यता आहे. या मंत्रिमंडळात भाजपला २०, शिवसेनेला ( एकनाथ शिंदे ) १३ व राष्ट्रवादी काँग्रेसला (अजित पवार) ९ मंत्रीपदे असे सूत्र निश्चित झाल्याचे समजते. मंत्रिमंडळात काही जागा रिक्त ठेवल्या जाणार असून पहिल्या टप्प्यात प्रत्येकी आठ-नऊ मंत्र्यांचा शपथविधी होण्याची शक्यता आहे. भाजपकडून काही नवीन व तरुण चेहऱ्यांना संधी दिली जाणार असून सत्तरी गाठलेल्या नेत्यांना संधी मिळणे अवघड आहे. मुंबईतून दोन-तीन नेत्यांना मंत्रीपदाची संधी मिळण्याची शक्यता आहे.
हेही वाचा >>>मुंबई : गोखले पुलाचे काम अंतिम टप्प्यात, एप्रिलपर्यंत वाहतूक सुरू करण्याचे आव्हान
चर्चा थंडावली
●सरकार स्थापण्याबाबत केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्याकडे गुरुवारी मध्यरात्री झालेल्या बैठकीनंतर पुढील रणनीती ठरविण्यासाठी मुंबईत चर्चा करण्यात येईल.
●पण शुक्रवारी काळजीवाहू मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे सातारा जिल्ह्यातील त्यांच्या गावी रवाना झाले. ते रविवारी मुंबईत परतण्याची शक्यता आहे.
●शनिवारी देवेंद्र फडणवीस व अजित पवार हे दोघेही मुंबईबाहेरच होते. यामुळे पुढील चर्चा अजून झालेली नाही. मंत्र्यांची संख्या आणि खातेवाटप यावर सोमवारनंतरच चर्चा होईल, असे समजते.