मुंबई : Kanjurmarg Carshed Metro 6 स्वामी समर्थ नगर ते विक्रोळी मेट्रो ६ च्या कांजूरमार्ग येथील कारशेडचा मार्ग अखेर मोकळा झाला आहे. कांजूरमार्ग येथील १५ हेक्टर जागेचा ताबा मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाने (एमएमआरडीए) बुधवारी घेतला. लवकरच या कारशेडच्या बांधकामासाठी निविदा काढून कामाला सुरुवात करण्याचा एमएमआरडीएचा प्रयत्न आहे.

मेट्रो ६ साठी २०१६ मध्ये कांजूरमार्ग येथे कारशेड बांधण्याचा प्रस्तावर होता. २०१७ मध्ये सरकारने त्यास मान्यता दिली. मात्र, २०२० मध्ये ही जागा वादात अडकली. मेट्रो ३ (कुलाबा-वांद्रे-सीप्झ) चे कारशेड आरेतून या जागेवर हलविल्यानंतर केंद्र सरकारने या जागेवर मालकी हक्क असल्याचे सांगत उच्च न्यायालयात धाव घेतली. त्यानंतर आतापर्यंत हा वाद सुरू होता. मात्र, शिंदे-फडणवीस सरकारने मेट्रो ३ साठी कारशेड पुन्हा आरेमध्ये नेल्यानंतर जागेचा वाद संपुष्टात आला. तर, आता सरकारने कांजूरमार्गची १५ हेक्टर जागा मेट्रो ६ साठी एमएमआरडीएला दिली आहे.

Assembly Election 2024 Extra Rounds of Best Bus on Polling Day Low floor deck buses will run for disabled elderly voters
मतदानाच्या दिवशी बेस्ट बसच्या जादा फेऱ्या; दिव्यांग, वृद्ध मतदारांसाठी ‘लो फ्लोअर डेक’ बस धावणार
Nana Patole On Devendra Fadnavis :
Nana Patole : निकालाआधी राजकीय घडामोडींना वेग; यातच…
goa cm pramod sawant
Pramod Sawant: महायुती की महाविकास आघाडीच्या काळात उद्योग महाराष्ट्राबाहेर? मुख्यमंत्र्यांचे मोठे विधान
Reliance-Disney merger completed, Reliance-Disney,
रिलायन्स-डिस्ने यांचे ७०,३५२ कोटींचे महाविलीनीकरण पूर्ण
traffic congestion, Parking problem APMC navi mumbai double parking, trucks
एपीएमसीतील पार्किंग समस्या जटिल, ट्रकच्या दुहेरी पार्किंगमुळे वाहतूक कोंडी
slum MIDC
एमआयडीसीलाही झोपड्यांच्या जागा, ‘क्लस्टर’साठी साडेबारा टक्के योजनेचा प्रस्ताव
maharashtra assembly election 2024 traffic diversions in pune city on occasion of pm modi visit
पंतप्रधानांच्या दौऱ्यानिमित्त शहरात वाहतूक बदल; स. प. महाविद्यालय परिसरातील रस्ते वाहतुकीस बंद
mega block on central and western line for repair of railway tracks and signals system
Mumbai Local Train Update: रविवारी मध्य, पश्चिम रेल्वेवर मेगाब्लॉक

 सरकारच्या आदेशानुसार मुंबई उपनगर जिल्हाधिकारी यांनी जागेच्या हस्तांतरणाची सर्व प्रक्रिया पूर्ण करत ‘एमएमआरडीए’कडून हमीपत्र घेत सोमवारी जागा ताब्यात घेण्याचे लेखी आदेश ‘एमएमआरडीए’ला दिले होते. त्यानुसार बुधवारी  जागेचा ताबा घेण्यात आल्याची माहिती महानगर आयुक्त एस.व्ही.आर. श्रीनिवास यांनी ‘लोकसत्ता’ला दिली. आता लवकर कारशेडच्या कामाला सुरुवात करण्याचे ‘एमएमआरडीए’चे प्रयत्न आहेत. त्यानुसार येत्या काही दिवसांतच कारशेडच्या बांधकामासाठी निविदा काढण्यात येणार असल्याचेही श्रीनिवास यांनी सांगितले.