लोकसत्ता खास प्रतिनिधी

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip

मुंबईः अनैतिक संबंधाच्या संशयावरून धारावी परिसरात महिलेची पतीने हत्या केल्याची घटना बुधवारी घडली. या प्रकरणी शाहू नगर पोलिसांनी हत्येचा गुन्हा दाखल करून पतीला अटक केली.

धारावी येथील गोपाळशेट्टी गल्लीतील चाळीत रेणू विश्वकर्मा (२८) पती रामसुमेर विश्वकर्मा (४५) याच्यासोबत राहत होती. रेणूचे आपल्या मित्रासोबत अनैतिक संबंध असल्याच्या रामसुमेरला संशय होता. यावरून दोघांमध्ये बुधवारी कडाक्याचा वाद झाला. त्यावेळी संतापलेल्या रामसुमेरने घरातील कातर रेणीच्या गळ्यात भोसकली. त्यानंतर रेणूला शीव येथील लोकमान्य टिळक रुग्णालयात नेण्यात आले.

हेही वाचा… “बाहेर देता तसं काकांकडेही लक्ष द्या”, राज ठाकरेंच्या सल्ल्यावर अजित पवारांचं प्रत्युत्तर, म्हणाले…

मात्र तेथील डॉक्टरांनी तिला मृत घोषित केले. या प्रकरणी शाहू नगर पोलिसांनी हत्येचा गुन्हा दाखल करून रामसुमेरला अटक केल्याची माहिती वरिष्ठ पोलीस निरीक्षक जितेंद्र कांबळे यांनी दिली. या प्रकरणी शाहू नगर पोलीस अधिक तपास करीत आहेत.