मुंबई : राज्य परिवहन महामंडळाच्या (एसटी) ताफ्यात नव्या बांधणीची निमआराम श्रेणीतील ‘हिरकणी’ बस मुंबई-पुणेकरांच्या पसंतीस पडली आहे. नव्या हिरकणीचा रंग हा हिरवा, पांढरा आणि त्यावर भगव्या रंगाची छटा आहे. मात्र, यात बदल करून आता जांभळ्या आणि पांढऱ्या रंगाची रंगसंगती ‘हिरकणी’ला देण्यात येणार असून लवकरच नवी ‘हिरकणी’ एसटी महामंडळाच्या ताफ्यात दाखल होणार आहे.

एसटी महामंडळाच्या पुण्यातील दापोडी येथील मध्यवर्ती कार्यशाळेत नवी ‘हिरकणी’ बस आकाराला येत आहे. भविष्यात २०० नव्या ‘हिरकणी’ बस प्रवाशांच्या सेवेत दाखल होणार आहेत. मात्र, सध्याची रंगसंगती बदलून ‘हिरकणी’ला पांढरा आणि जांभळा रंग देण्याचा निर्णय एसटी महामंडळाने घेतला आहे. भविष्यात पाढऱ्या-हिरव्याऐवजी पांढऱ्या-जांभळ्या रंगसंगतीत ‘हिरकणी’ दिसणार आहे. महामंडळाने २०१५-१६ साली नव्याने हिरकणी बस तयार केली. पुन्हा एकदा प्रवाशांच्या पसंतीस उतरलेली ‘हिरकणी’ पांढऱ्या-हिरव्या रंगसंगतीत होती. मात्र, आता पुन्हा एकदा ‘हिरकणी’चा रंग बदलण्यात येणार आहे.

Mumbai Suicide News
माजी भाजपा खासदाराच्या पुतण्याची मुंबईत आत्महत्या, इमारतीच्या सहाव्या मजल्यावरून घेतली उडी
18th October 2024 Horoscope In Marathi
१८ ऑक्टोबर पंचांग: नोकरदारांच्या कुंडलीत अच्छे दिन तर…
Malad Road rage mns activist Akash Maeen death
Malad Road Rage: ‘आमच्या डोळ्यादेखत त्याला जीवे मारलं’, मनसे कार्यकर्ता आकाश माईनच्या आईनं व्यक्त केला आक्रोश
pune husband kills wife
चारित्र्याच्या संशयातून महिलेच्या डोक्यात सिलिंडर घालून खून, विश्रांतवाडी भागातील घटना; पती गजाआड
Cloudy weather in Dadar rain during Dussehra melava in shivaji park
दसरा मेळाव्यावर पावसाचे सावट, दादरमध्ये पावसाच्या हलक्या सरींना सुरुवात
thane building
डोंबिवलीत कोपरमध्ये रस्ता बंद करून बेकायदा इमारतीची उभारणी करणाऱ्या बांधकामधारकांना साहाय्यक आयुक्तांची नोटीस
Loksatta chaturang bhay bhuti Fear of an event in life
‘भय’भूती: भय-भोवरा
pune dry fruits theft
आंबा बर्फीनंतर चोरट्यांच्या सुकामेव्यावर ताव; वारज्यातील दुकानातून रोकड, सुकामेव्याची पाकिटे लंपास

हेही वाचा – ‘मेट्रो ४’चे ४९ टक्के काम पूर्ण, खटल्याचा निकाल एमएमआरडीएच्या बाजूने लागल्याने कामास वेग

आताच्या नव्या ‘हिरकणी’ला दिलेली रंगसंगती विजेवर धावणाऱ्या ‘शिवाई’ बसला देणार असल्याचे समजते आहे. या ‘हिरकणी’ला पुन्हा पांढरा – जांभळा रंग देण्याचे नियोजन करण्यात येत असल्याचे समजते. जांभळा रंग उन्हात फिकट होत असल्याने २०१५ साली ‘हिरकणी’ पुन्हा हिरवा – पांढरा आणि त्यावर निळा पट्टा अशा रुपात सेवेत दाखल झाली होती. पांढरा आणि जांभळा रंगातील ‘हिरकणी’ आकर्षक वाटणार नाही, असे मत ‘बस फाॅर अस फाउंडेशन’चे अध्यक्ष रोहित धेंडे यांनी व्यक्त केले.


मुंबई-पुण्यादरम्यान धावणाऱ्या पहिल्याच ‘हिरकणी’ बसमध्ये अनेक त्रुटी असून यात सुधारणा करण्याची आवश्यकता आहे, असे प्रवाशांचे म्हणणे आहे. पूर्वीच्या ‘हिरकणी’मध्ये स्वतंत्र चालक केबिन (केबिन पार्टिशयन) होते. मात्र, नव्या ‘हिरकणी’ बसमध्ये केबिन पार्टिशियनचा अभाव आहे. तसेच, या बसच्या ‘ए-पिलर’ (बसच्या डावीकडील बाजू) मोठा ठेवल्याने आणि तिथे पारदर्शक काच न लावल्याने चालकाला डावीकडील रस्ता किंवा वाहने नीट दिसत नाहीत. त्यामुळे अपघात होण्याची शक्यता आहे.

हेही वाचा – पर्यटकांच्या वाढत्या संख्येमुळे महाबळेश्वरमधून मुंबई, पुण्यासाठी जास्तीच्या एसटी फेऱ्या

‘हिरकणी’च्या रंगसंगतीत बदल करण्यात येणार आहे. पूर्वीच्या रंगसंगतीप्रमाणे ‘हिरकणी’ला जांभळा आणि पांढरा रंग देण्याचे नियोजन सुरू आहे. नव्या ‘हिरकणी’मध्ये केबिन पार्टिशियनची रचना करता येईल का याचा अभ्यास सुरू आहे. ‘हिरकणी’तील छोट्या-मोठ्या त्रुटीत सुधारणा केली जात आहे, असे एसटी, उपाध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक, शेखर चन्ने म्हणाले.