मुंबई : राज्यातील शालेय विद्यार्थ्यांमधील गुणवत्तेमध्ये अनेक प्रयत्नांनंतरही अद्याप सुधारणा झाली नसल्याचे ‘प्रथम एज्युकेशन फाऊंडेशन’ने केलेल्या ‘अॅन्युअल स्टेटस ऑफ एज्युकेशन’ (असर) सर्वेक्षणामध्ये स्पष्ट झाले आहे. यानुसार सुमारे २५ टक्के विद्यार्थांना इयत्ता दुसरीचे मराठी वाचता आले नाही तर ६४ टक्के विद्यार्थ्यांना तीन अंकी संख्येला एका अंकी संख्येने भागता आले नाही.

पहिली ते दहावीच्या विद्यार्थ्यांनी अवगत केलेल्या भाषिक आणि गणिती कौशल्यांची पाहणी ‘असर’ सर्वेक्षणात करण्यात आली आहे. वयानुसार आवश्यक वाचन कौशल्ये आत्मसात केलेल्या विद्यार्थ्यांचे प्रमाण म्हणजेच दुसरीच्या दर्जाचे वाचता येणाऱ्या दुसरीतील विद्यार्थ्यांचे प्रमाण केवळ १७.५ टक्के आहे. आठवीच्या २५.८ टक्के विद्यार्थ्यांना दुसरीच्या स्तराचा मराठीतील परिच्छेद वाचता आला नाही. आठवीतील ६.३ टक्के विद्यार्थ्यांना केवळ सोपे शब्द वाचता आले, मात्र सोपी वाक्ये वाचता आली नाहीत. ३.६ टक्के विद्यार्थ्यांना अक्षरे ओळखता आली पण शब्द वाचता आले नाहीत तर १.७ टक्के विद्यार्थ्यांना अक्षरओळखही नसल्याचे विदारक चित्र यंदा पुन्हा दिसले आहे.

Government school Number of students who have increased during the Corona period returns to their original positions Mumbai news
सरकारी शाळा पुन्हा ओस; करोनाकाळात वाढलेली पटसंख्या मूळ पदावर
Buddha head Ratnagiri
Buddha head Ratnagiri: भव्य बुद्धशीर्ष व मोठा तळहात…
Extension of toll concession on Atal Setu Mumbai news
अटल सेतूवरील टोल सवलतीला मुदतवाढ; आणखी वर्षभर २५० रुपयेच पथकर
state education department big decision vanish blank pages textbooks
शिक्षण विभागाचा मोठा निर्णय, पाठ्यपुस्तकांतून वह्यांची कोरी पाने हद्दपार
Hearing on municipal elections in Supreme Court on February 25
निवडणुका पावसाळ्यानंतर? पालिकांबाबत सर्वोच्च न्यायालयात आता २५ फेब्रुवारीला सुनावणी
Nawab Malik big claims about maharashtra Election
Nawab Malik: शरद पवार आणि एकनाथ शिंदे संपर्कात?, ‘निवडणुकीनंतर काहीही होऊ शकतं’, नवाब मलिक यांचा दावा
CM devendra Fadnavis orders Health Department to make special arrangements for GBS Mumbai news
‘जीबीएस’साठी विशेष व्यवस्था करा! मुख्यमंत्र्यांचे आरोग्य विभागाला आदेश
वर्सोव्यातील शिवसेना शाखेच्या जागेवरून वाद; राजूल पटेल यांनी कुलूप लावल्याने तणाव

गणिती कौशल्यांची स्थिती भाषिक कौशल्यांपेक्षाही भयानक आहे. तीन अंकी संख्येला एक अंकी संख्येने भागण्याचे गणित आठवीतील अवघ्या ३६.३ टक्के विद्यार्थ्यांना सोडवता आले. भागाकाराचे गणित न येणाऱ्या साधारण ६४ टक्के विद्यार्थ्यांपैकी २३.५ टक्के विद्यार्थ्यांना दोन अंकी संख्येतून दोन अंकी संख्या वजा करता आली. उर्वरित विद्यार्थ्यांपैकी १.१ टक्के विद्यार्थ्यांना अंकओळखही नसल्याचे दिसून आले आहे.

फोनचा वापर, पण सुरक्षेबाबत अनभिज्ञ

● १४ ते १६ वयोगटातील ६३.३ टक्के विद्यार्थ्यांकडून शैक्षणिक बाबींसाठी ‘स्मार्ट फोन’चा वापर

● समाजमाध्यमांचा वापर करणाऱ्या विद्यार्थ्यांचे प्रमाण ७२.७ टक्के

● समाजमाध्यमांवर घ्यायची काळजी, सुरक्षा याबाबत जागरुकता नाही

● खाते ब्लॉक करण्याबाबत ६०.९ टक्के; माहिती खासगी राखण्याबाबत ५५.२ टक्के; पासवर्ड बदलण्याबाबत ५५.७ टक्के विद्यार्थ्यांनाच माहिती

● खाते ब्लॉक करण्याबाबत ५४.५ टक्के; माहिती खासगी ठेवण्याबाबत ४८.४ टक्के; पासवर्ड बदलण्याबाबत ४७.२ टक्के मुली जागरुक

Story img Loader