मागील काही दिवसांपासून मुंबईमध्ये सहा ते नऊ महिन्यांच्या बालकांचा गोवरने मृत्यू होण्याच्या घटनेत वाढ झाली आहे. त्यामुळे यापुढे सहा ते नऊ महिन्यांच्या बालंकाच्या लसीकरणावर भर देत याची व्याप्ती वाढविण्यात येणार आहे, अशी माहिती डॉ. सुभाष साळुंके यांनी दिली.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

हेही वाचा – मुंबई: जी २० परिषदेच्या तयारीसाठी रस्त्यांच्या दुरुस्तीवर १० कोटींचा खर्च

हेही वाचा – मुंबई : विकासकांना आता म्हाडाकडे विकास शुल्क भरावे लागणार; शुल्कापोटी ८०० कोटींची थकबाकी?

मुंबईमध्ये मागील काही दिवसांमध्ये पाच बालकांचा गोवरने मृत्यू झाला. ती सर्व बालके हे सहा ते नऊ महिन्यांच्या वयोगटातील होती. तसेच या वयोगटातील बालकांना गोवरची लागण होताना दिसून येत आहे. आतापर्यंत उद्रेक असलेल्या भागामधील सहा ते नऊ महिने वयोगटातील बालकांना गोवरची लस देण्यात येत होती. मात्र अन्य भागामध्ये गोवरची होत असलेली लागण लक्षात घेता, सहा ते नऊ महिने वयोगटातील बालकांच्या लसीकरणावर भर देण्याबाबत लवकरच चर्चा करण्यात येणार आहे. या वयोगटातील बालकांमधील गोवरच्या प्रादुर्भावाची व्याप्ती पाहून अंदाज या चर्चेमध्ये घेण्यात येईल. त्यानंतरच सहा ते नऊ महिने वयोगटातील बालकांच्या लसीकरणाबाबत योग्य निर्णय घेण्यात येईल. या वयोगटातील बालकांच्या लसीकरणाबाबत जागतिक आरोग्य संघटना आणि यूनिसेफ यांच्यासोबतही चर्चा करण्यात येईल, त्यानंतरच लसीकरणाबाबत निर्णय घेण्यात येईल, अशी माहिती डॉ. साळुंके यांनी दिली.

Mumbai News (मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: The scope of vaccination of children aged six to nine months will be increased in mumbai on the backdrop of measles mumbai print news ssb