गोरेगाव येथील आरे दुग्ध वसाहतीत दीड वर्षाच्या मुलीवर हल्ला करणाऱ्या बिबट्याला जेरबंद करण्यासाठी वन विभागाचे प्रयत्न सुरू आहेत. वन विभागाने हल्ला झालेल्या परिसरात पिंजरे लावून गेल्या आठवड्यात दोन बिबट्यांना पकडले. मात्र, हे दोन्ही नर बिबटे असून हल्ला मादी बिबट्याने केला असावा असा संशय वनविभागाला आहे. त्यामुळे आरेमधील हल्लेखोर बिबट्याचा शोध अजूनही सुरूच आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

हेही वाचा >>>Sanjay Raut Bail Plea : संजय राऊतांना जामीन मिळणार? ९ नोव्हेंबरला न्यायालय देणार निकाल

आरेमध्ये बिबट्याच्या हल्ल्यात दीड वर्षाच्या मुलीचा मृत्यू झाला. त्यानंतर हल्लेखोर बिबट्याला पकडण्यासाठी वन विभागाने जागोजागी कॅमेरे, पिंजरे बसवले. हा हल्ला आरे परिसरामध्ये वावर असणाऱ्या सी-५५ आणि सी-५६ बिबट्यापैकी एकाने केला असल्याचा संशय वन विभागाला होता. त्यामुळे आरे युनिट क्रमांक १५ च्या परिसरात कॅमेरा ट्रॅपही वाढवले होते. याशिवाय बिबट्याच्या प्रत्येक हालचालींवर विशेष अधिकाऱ्यांचे पथकही लक्ष ठेवून होते. त्यानंतर यात २६ ऑक्टोबर आणि ३० ऑक्टोबर यादिवशी दोन नर बिबटे पकडण्यात आले.

हेही वाचा >>>मुंबई : मतदान दिनी मतदान कल चाचणीस (EXIT POLL) प्रतिबंध

मात्र, हे दोन्हीही बिबटे हल्लेखोर नसल्याचे प्राथमिक तपासात दिसून येत आहे. हा हल्ला मादी बिबट्याने केला असल्याचा निकष लावला जात आहे. मात्र, अद्याप मादी बिबट्या पिंजऱ्यात अडकलेली नाही.आरेमध्ये जेरबंद केलेल्या दोन बिबट्यांपैकी एका बिबट्याला तपासणीनंतर नैसर्गिक अधिवासात सोडण्यात आले आहे. तर, दुसरा बिबट्या अद्याप संजय गांधी राष्ट्रीय उद्यानातील केंद्रात आहे. आरे परिसरातील बिबट्याची जुनी माहिती, फोटो आणि सीसीटीव्ही चित्रण तपासून ओळख पटवली जात आहे. संशयित मादी बिबट्याच्या हालचालींवर कॅमेऱ्याद्वारे, गस्त पथकाद्वारे लक्ष ठेवण्यात येत आहे, अशी माहिती वन विभागातील अधिकाऱ्यांकडून देण्यात आली.

Mumbai News (मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: The search for the attacking leopard in aarey begins mumbai print news amy