गाडय़ांचे सुटे भाग हाती आल्याने वडाळा-सातरस्ता मार्गातील अडसर दूर
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा
अक्षय मांडवकर, मुंबई : बिघडलेल्या मोनो गाडय़ांचे सुटे भाग उपलब्ध नसल्यामुळे अडचणीत आलेल्या मोनो रेल प्रकल्पाचा बहुप्रतीक्षित वडाळा ते संत गाडगे महाराज चौक (सातरस्ता) हा दुसरा टप्पा मार्चच्या पहिल्या आठवडय़ात सुरू होणार आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते या टप्प्याचे उद्घाटन केले जाईल.
बिघडलेल्या गाडय़ांच्या एक हजार ३०० यांत्रिक भागांच्या खरेदीसाठी प्राधिकरणाने सुमारे ६८ कोटी रुपये ‘स्कोमी’ला दिले होते. खरेदी करण्यात आलेले यांत्रिक भाग ‘स्कोमी’ने सीमाशुल्क न भरल्याने बंदरात अडकून पडले होते. आता एमएमआरडीएने हे शुल्क भरले आहे. त्यासाठीचा भुर्दंड एमएमआरडीएला सहन करावा लागला आहे. पुढील काही दिवसांत हे यांत्रिक भाग जेएनपीटी बंदरातून प्राधिकरणाच्या ताब्यात येतील. हे भाग दोन बिघडलेल्या गाडय़ांमध्ये बसवून दुसरा टप्पा सुरू करण्यात येणार आहे.
मुंबईत भारतातील पहिली मोनो रेल सेवा सुरू झाली. गेल्या शुक्रवारी या सेवेला पाच वर्षे पूर्ण झाली. या दरम्यान मोनोच्या मार्गात बरीच विघ्ने आली. पाच वर्षांपूर्वी मोनोच्या सेवेत १० गाडय़ांचा ताफा होता. आता केवळ तीन गाडय़ांच्या बळावर ही सेवा हाकली जात आहे. प्रकल्प सुरू झाल्यापासून त्याचे व्यवस्थापन पाहणाऱ्या मलेशियन कंपनी ‘स्कोमी’ला डिसेंबरमध्ये ‘एमएमआरडीए’ने हद्दपार केले. व्यवस्थापनातील घोळ आणि प्रकल्पाला आर्थिक डबघाईला आणल्याचे कारण देत प्राधिकरणाने स्कोमीला बाहेरचा रस्ता दाखविला. त्यानंतर ‘प्रकल्प अंमलबजावणी युनिट’ (पीआययू) स्थापन करून प्राधिकरणाने मोनोच्या संचालनाची जबाबदारी आपल्या खांद्यावर घेतली. त्यापूर्वी एक वर्षांच्या खंडानंतर सप्टेंबर २०१८ मध्ये मोनोचा पहिला टप्पा पुन्हा कार्यान्वित करण्यात आला. त्यावेळी ४ गाडय़ा पहिल्या टप्प्याच्या मार्गिकेवर धावत होत्या. मात्र प्राधिकरणाने प्रकल्प ताब्यात घेण्यापूर्वीच चार गाडय़ांपैकी एक गाडी बिघडली.
तत्पूर्वी स्कोमीच्या ढिसाळ कारभारामुळे बिघडलेल्या सहा गाडय़ा डेपोत उभ्या होत्या. आता ती संख्या सातवर गेली आहे. त्यापैकी २ गाडय़ा भंगारात काढाव्या लागणार आहेत. दोनपैकी एक गाडी म्हैसूर स्थानकात लागलेल्या आगीमुळे पूर्णपणे बिघडली आहे. तर दुसरी गाडी तांत्रिक कारणांमुळे दुरुस्त करण्याजोगी राहिलेली नाही. त्यामुळे या गाडय़ांची विमा रक्कम मिळवून त्या भंगारात काढण्याची प्रक्रिया सध्या सुरू आहे.
सीमाशुल्क विभागाकडे अडकून पडलेले यांत्रिक भाग आमच्या ताब्यात आले आहेत. त्याआधारे सुरुवातीला दोन गाडय़ा दुरुस्त करून दुसरा टप्पा कार्यान्वित करण्याचा विचार आहे. मार्चच्या पहिल्या आठवडय़ात मोनोचा वडाळा ते सातरस्ता हा दुसरा टप्पा सुरू होईल.
-आर. ए. राजीव, महानगर आयुक्त, एमएमआरडीए