लोकसत्ता प्रतिनिधी

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

मुंबई: छत्रपती शिवाजी महाराज यांच्यावर आधारित ‘वेडात मराठे वीर दौडले सात’ या महेश मांजरेकर दिग्दर्शित, वसीम कुरेशी निर्मित चित्रपटाचे चित्रीकरण सध्या वेगात सुरू आहे. प्रदर्शनाआधीच वादाने घेरलेल्या या ऐतिहासिक चित्रपटाचे चित्रिकरण लवकरात लवकर पूर्ण करण्याचे प्रयत्न सुरू आहेत. या चित्रपटात अभिनेता अक्षय कुमार शिवाजी महाराजांची भूमिका साकारत आहे.

शिवकालीन इतिहासातील एक महत्त्वाची घटना ऐतिहासिकपटाच्या भव्यदिव्य रुपात प्रेक्षकांसमोर ठेवणाऱ्या या चित्रपटासाठी खूप सखोल संशोधन करण्यात आले आहे. दिग्दर्शन आणि पटकथा लेखन हे दोन्ही शिवधनुष्य महेश मांजरेकर यांनी या चित्रपटासाठी पेलले असून हा चित्रपट खूप चांगल्या पध्दतीने प्रेक्षकांपर्यंत पोहोचावा यासाठी चित्रिकरणात कोणतीही त्रुटी राहू नये यासाठी मांजरेकर प्रचंड मेहनत घेत आहेत, असे कौतुक चित्रपटाचे निर्माते वसीम कुरेशी यांनी केले. छत्रपती शिवाजी महाराजांची भूमिका साकारणे हे माझे स्वप्न होते. या स्वप्नपूर्तीच्या क्षणासाठी मी शंभर टक्के प्रयत्न करीत आहे. महेश मांजरेकर यांच्या मार्गदर्शनामुळे शिवाजी महाराजांची भूमिका करणे सोपे झाले आहे, अशी भावना अक्षय कुमारने व्यक्त केली.

हेही वाचा… मुंबई: मनोरा पुनर्विकासाचे जूनमध्ये भूमिपूजन

वसीम कुरेशी यांची निर्मिती असलेल्या ‘देहाती डिस्को’ या हिंदी चित्रपटाला प्रेक्षकांचा चांगला प्रतिसाद मिळाला होता. आता ‘वेडात मराठे वीर दौडले सात’ या मराठी चित्रपटाबरोबरच त्यांचा अभिनेता पुलकित सम्राट आणि अभिनेत्री इसाबेला कैफ यांची मुख्य भूमिका असलेला ‘सुस्वागतम खुशामदीद’ हा हिंदी चित्रपटही लवकरच प्रदर्शनासाठी सज्ज झाला आहे. ‘वेडात मराठे वीर दौडले सात’ हा बहुभाषिक चित्रपट असून या चित्रपटात जय दुधाणे, उत्कर्ष शिंदे, विशाल निकम, विराट मडके, हार्दिक जोशी, सत्या मांजरेकर, अक्षय कुमार, नवाब खान आणि प्रवीण तरडे यांच्या महत्त्वाच्या भूमिका आहेत.

Mumbai News (मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: The shooting of movie vedat marathe veer daudle saat is going on fast in mumbai print news dvr