राज्य सरकारने महिलांमध्ये आरोग्याबाबत जनजागृती करण्यासाठी विशेष मोहीम हाती घेण्याचा निर्णय घेतला आहे. महिलांसाठी स्तन कर्करोग उपाययोजना आणि जनजागृती, मौखिक आरोग्य, थायरॉईडबाबत अभियान राबविण्यात येणार आहे. यासंदर्भात आरोग्य विभागाचे सचिव, संचालक आणि राज्य सरकारच्या रुग्णालयांचे प्रमुख एकत्र येऊन याबाबत निर्णय घेणार आहेत.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

हेही वाचा >>>मुंबई-अहमदाबाद बुलेट ट्रेन प्रकल्पाचा मार्ग अखेर मोकळा! गोदरेज कंपनीची याचिका उच्च न्यायालयाने फेटाळली

उत्तम आरोग्यासाठी महिलांमध्ये जागरुकता निर्माण करणे आणि त्यावर योग्य वेळी उपाययोजना करणे आवश्यक आहे. या पार्श्वभूमीवर राज्य सरकारने महिलांच्या आरोग्यासाठी एक महत्त्वपूर्ण पाऊल उचलणार आहे. महिलांच्या आरोग्यासाठी विशेष आरोग्य मोहीम राबविण्याचा विचार सरकारी पातळीवर सुरू आहे. यामध्ये महिलांमधील स्तन कर्करोग जागरुकता आणि उपाययोजना अभियान राबविण्यात येणार आहे. त्याचप्रमाणे महिलांची मौखिक आरोग्य सुरक्षा, मोतीबिंदू, थायराईड यासंदर्भात विशेष अभियान राबविण्यात येणार आहे. त्याचप्रमाणे अवयवदान मोहीम, रक्तदान शिबीराचे आयोजन करण्याचे नियोजन आहे. यासंदर्भात आरोग्य विभागाचे सचिव, आरोग्य विभागाचे संचालक आणि राज्य सरकारच्या रुग्णालयांचे प्रमुख एकत्र येऊन ही आरोग्य मोहीम राबविण्याबाबत चर्चा करणार आहेत. त्यानंतर राज्यातील सर्व सरकारी रुग्णालयांमार्फत महिलांच्या आरोग्य सुरक्षेबाबत मोहीम हाती घेण्यात येणार असल्याचे आरोग्य विभागाच्या अधिकाऱ्याकडून सांगण्यात आले.

Mumbai News (मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: The state government will conduct a special campaign for women health mumbai print news amy