मुंबई ही स्वप्नांची नगरी आहे असं म्हटलं जातं. कित्येकजण आपली स्वप्न पूर्ण करण्यासाठी मुंबईत येतात आणि आपली स्वप्न पूर्ण करण्यासाठी अथक प्रयत्न करतात. अशीच मेहनत करतोय मुंबईतल्या मानखुर्द येथील महाराष्ट्र नगर परिसरात राहणारा राहुल नायडू. तिसरीत शिकणारा राहुल आपल्या कुटुंबियांच्या उदरनिर्वाहासाठी आपल्या आईला हातभार म्हणून कचरा वेचण्याचं काम करतोय. पण हे करताना तो आपली आवड देखील जपतोय. तर या व्हिडीओमधून पाहुयात कचरा वेचून आपलं पोट भरून कला जोपासणाऱ्या राहुलची कहाणी…
आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा
Already have a account? Sign in
राहुल कचरा वेचून आपल्यासोबतच आपल्या कुटुंबच पोट भरायला हातभार लावतोय, शिकतोय, त्याचबरोबर आपली कला जोपासण्याचा प्रयत्न देखील करतोय. राहुलसारखीच अनेक मुलं मुंबईच्या कानाकोपऱ्यात आपल्या हालाखीच्या परिस्थितीमुळे संघर्ष करत आहेत आणि आपल्या कलागुणांना वाव मिळावा याच अपेक्षेत आहेत.
First published on: 08-12-2021 at 12:16 IST
Mumbai News (मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: The story of rahul who is pursuing his passion by selling garbage pvp