सुशीलकुमार शिंदे / प्रसाद हावळे

मुंबईसह कोकणातील १२ लोकसभा मतदारसंघांचा ‘द स्ट्रेलेमा’ने घेतलेला हा अनुभवनिष्ठ धांडोळा…

Shegaon Gajanan Maharaj temple , Shegaon,
अवघी दुमदुमली संतनगरी! विदर्भ पंढरीत पाऊण लाख भाविकांची मंदियाळी…
Walmik Karad Surrender Case
वाल्मिक कराड ज्या गाडीतून शरण आला त्या गाडीच्या…
Distribution of fake inheritance certificates by court clerk navi Mumbai news
न्यायालयातल्या लिपिकाकडून बनावट वारस दाखल्यांचे वाटप;  पनवेल येथील न्यायालयातील प्रकार, लिपिक अटकेत
butibori flyover latest marathi news
गडकरींच्या जिल्ह्यातील उड्डाण पूल खचला, एक किमी वाहनांच्या रांगा
mhada bolinj loksatta news
वसई : बोळींज म्हाडा घरांच्या स्वस्ताईवर आधीचे खरेदीदार नाराज, फसवणूक केल्याचा आरोप
Nano Fertilisers loksatta marathi news
लोकशिवार : नॅनो खते; पिकांच्या अन्नद्रव्य व्यवस्थापनातील आविष्कार
Fire Lonar Rural Hospital, Lonar Rural Hospital Patient died,
बुलढाणा : लोणार ग्रामीण रुग्णालयात अग्नितांडव, रुग्णाचा बेडवरच कोळसा; विडीमुळे…
Tensions rise after cattle parts found under Khed Devane bridge
खेड देवणे पुलाखाली गोवंशाचे अवयव सापडल्याने तणाव

मुंबईसह कोकणात लोकसभेचे एकूण १२ मतदारसंघ येतात. यातील रत्नागिरी-सिंधुदुर्ग आणि रायगड या दोन मतदारसंघांत तिसऱ्या टप्प्यात मतदान पार पडले, तर उर्वरित पालघर, भिवंडी, कल्याण, ठाणे आणि मुंबईतील सहा मतदारसंघात पाचव्या टप्प्यात मतदान झाले. २०१९ च्या निवडणुकीत महायुतीला मुंबईसह कोकणात निर्भेळ यश मिळाले होते. यात शिवसेना सात, भाजप चार आणि राष्ट्रवादी काँग्रेस एका जागी यशस्वी झाली होती. मात्र, राज्यातील राजकीय उलथापालथींनंतर, विशेषत: शिवसेनेतील फुटीनंतर मुंबईसह कोकणातील मतदार काय भूमिका घेतात, हे पाहणे औत्सुक्याचे होते. याचे कारण मुंबईसह कोकण प्रदेश शिवसेनेशी बांधील असलेल्या मतदारांचा टापू म्हणून ओळखला जातो. शिवसेनेला राज्याच्या राजकारणात केंद्रस्थानी आणण्यात याच मतदारांनी हातभार लावला. १९९० आणि २००० च्या दशकात शिवसेनेत झालेल्या बंडाळीवेळीही याच मतदारांनी शिवसेनेला तारले. मात्र, शिवसेनेत यावेळी झालेला उठाव अभूतपूर्व होता. दोन शिवसेना, त्यांची दोन वेगवेगळी चिन्हे आणि राज्यातील महाविकास आघाडी व महायुती अशा दोन राजकीय गटांत झालेली त्यांची विभागणी- यामुळे मुंबईसह कोकणातील मराठी व हिंदुत्ववादी मतदारांपुढेही अभूतपूर्व पेच निर्माण झालेला पाहायला मिळाला. हा पेच सोडवताना येथील मतदारांनी महत्त्वपूर्ण राजकीय बदलांचे संकेत दिले.

त्याचे ठळक उदाहरण म्हणजे रत्नागिरी-सिंधुदुर्ग हा कोकणातील मतदारसंघ. गेली १५ वर्षे माजी मुख्यमंत्री नारायण राणे यांच्याशी होणाऱ्या संघर्षामुळे शिवसेनेसाठी हा मतदारसंघ प्रतिष्ठेचा बनत गेला. त्यात या मतदारसंघात गेली दहा वर्षे शिवसेनेचे वर्चस्व राहिले. विद्यामान खासदार विनायक राऊत हे पक्षफुटीनंतर उद्धव ठाकरेंसोबत राहिले आणि शिवसेना ठाकरे गटाकडून याहीवेळी त्यांची उमेदवारी कायम राखली गेली. त्यांच्याविरोधात भाजपकडून केंद्रीय मंत्री नारायण राणे यांना रिंगणात उतरवण्यात आल्याने हा मतदारसंघ अधिक चर्चेत आला. मतदारसंघाचा विकास आणि रिफायनरी प्रकल्पाचा वाद हे मुद्दे येथील निवडणुकीत कळीचे ठरलेले दिसले. विशेषत: रिफायनरी प्रकल्पाबाबत शिवसेना ठाकरे गटाचे खासदार आणि स्थानिक आमदार यांच्या वेगवेगळ्या भूमिका मतदारांनी मतदान करताना लक्षात ठेवल्याचे दिसले. ठाकरेंना मानणारा मतदार विनायक राऊत यांच्या पाठीशी उभा राहताना दिसला, तरी नारायण राणे यांनी प्रचारादरम्यान संयमी भूमिका घेतल्याचा फायदा भाजपला होताना पाहायला मिळाला. तसेच विनायक राऊत यांच्या तुलनेत नारायण राणे यांना उशिरा उमेदवारी जाहीर झाली, तरी भाजपकडून येथे प्रचार यंत्रणा नियोजनबद्ध पद्धतीने राबविण्यात आल्याचे दिसले. सावंतवाडी मतदारसंघाचा कल यावेळेस नारायण राणे यांच्याकडे दिसून आला. तर कणकवली व कुडाळ या मतदारसंघात राणेंना मिळणारी निर्णायक आघाडी विनायक राउत रत्नागिरी, चिपळूण आणि राजापूर मतदारसंघातून भरून काढू शकतील का, हे पाहणे औत्सुक्याचे राहील.

हेही वाचा >>> Mumbai North West Lok Sabha constituency : अल्पसंख्याकांची मते निर्णायक!

शेजारी रायगड लोकसभा मतदारसंघात शिवसेना ठाकरे गट विरुद्ध राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) अशी लढत झाली. शिवसेना ठाकरे गटाकडून माजी खासदार अनंत गीते, तर राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) पक्षाकडून विद्यामान खासदार सुनील तटकरे यांना रिंगणात उतरवण्यात आले. पक्षफुटीमुळे उद्धव ठाकरे आणि शरद पवार यांना मतदारांची असलेली सहानुभूती आणि शेतकरी कामगार पक्षाचे सहकार्य या बाबी अनंत गीते यांच्यासाठी जमेच्या ठरल्या. मात्र, महायुतीकडून येथे करण्यात आलेले राजकीय व्यवस्थापनही प्रभावी ठरताना दिसले. विशेषत: मतदारसंघातील पेण, श्रीवर्धन व अलिबागमधील कुणबी मतदारांचे विभाजन करण्यात आणि अन्य ओबीसी मतदारांना आकर्षित करण्यात सुनील तटकरे यांना यश मिळताना दिसले. तर मुस्लीम आणि दलित मतदार येथे प्रामुख्याने महाविकास आघाडीच्या बाजूने वळलेला दिसला. सहानुभूतीसोबतच शेवटच्या काळात ही निवडणूक कमालीची उमेदवारकेंद्री झालेली दिसून आली. त्यातूनच शिवसेनेचा प्रभाव असलेल्या गुहागर आणि दापोलीमधील मतदार गीतेंसोबत राहतो का आणि वर्षानुवर्षे सोबत राहिलेला पारंपरिक मतदार तटकरे राजकीय व्यवस्थापनाच्या जोरावर सोबत ठेवू शकतील का, याच्या उत्तरातच येथील निकाल दडलेला आहे.

पालघर लोकसभा मतदारसंघ हा २०१८ साली झालेल्या पोटनिवडणुकीत भाजप विरुद्ध शिवसेना अशा लढतीमुळे कमालीचा चर्चेत राहिला. त्याचीच पुनरावृत्ती यंदाही भाजप विरुद्ध शिवसेना (ठाकरे गट) अशा सामन्यातून दिसून आली. भाजपकडून हेमंत सावरा यांना, तर शिवसेना (ठाकरे गट) पक्षाकडून भारती कामडी यांना उमेदवारी देण्यात आली. त्यात बहुजन विकास आघाडीचे बोईसरचे आमदार राजेश पाटील यांच्या उमेदवारीमुळे येथील निवडणूक तिरंगी झाली. बोईसरसह वसई आणि नालासोपारा या विधानसभा मतदारसंघांत बहुजन विकास आघाडीचे वर्चस्व आहे. त्याचा फायदा राजेश पाटील यांना येथे मिळताना दिसला. मात्र, नालासोपारामधील उत्तर भारतीय मतदार भाजपच्या बाजूने, तर संपूर्ण लोकसभा मतदारसंघातील मुस्लीम व ख्रिास्ती मतदार महाविकास आघाडीच्या बाजूने वळलेला दिसला. डहाणू व विक्रमगडमध्ये मित्र पक्षांचे आमदार असणे ही बाब शिवसेना ठाकरे गटाच्या पथ्यावर पडताना दिसली. मात्र, वाढवण बंदराबाबतची भूमिका परिणामकारक करण्यात ठाकरे गटाला आलेले अपयश येथे महायुतीसाठी फायद्याचे ठरताना दिसले. तसेच विक्रमगड आणि डहाणू येथील मतदारांचे विभाजन करण्यात महायुतीला मिळालेले यश येथील निकालाची दिशा ठरवणारे राहील.

हेही वाचा >>> Mumbai North East Lok Sabha Constituency : मतांचे ध्रुवीकरण महत्त्वाचे ठरणार

शेजारी ठाणे जिल्ह्यात तीन लोकसभा मतदारसंघ येतात. भिवंडी, कल्याण आणि ठाणे. भाजप (भिवंडी), शिवसेना शिंदे गट (कल्याण) आणि शिवसेना ठाकरे गट (ठाणे) असे प्रत्येकी एक विद्यामान खासदार ठाणे जिल्ह्यात आहेत. तिन्ही पक्षांकडून येथे विद्यामान खासदारांची उमेदवारी याहीवेळी कायम राखली गेली. मात्र, भिवंडीमधील निवडणूक तिरंगी लढतीमुळे, तर कल्याण आणि ठाणे येथील निवडणूक दोन्ही शिवसेनांतील थेट लढतींमुळे चुरशीची ठरली. भिवंडीत भाजपकडून कपिल पाटील, तर राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाकडून सुरेश म्हात्रे आणि अपक्ष उमेदवार निलेश सांबरे अशी तिरंगी लढत झाली. आगरी, कुणबी, आदिवासी, मुस्लीम आणि दलित मतदार या मतदारसंघात निर्णायक संख्येत आहेत. यातील आगरी मतदार पाटील आणि म्हात्रे यांच्यामध्ये विभागला गेला. तर कुणबी मतदार प्रामुख्याने सांबरे यांच्या बाजूने वळलेला दिसला. मुरबाड विधानसभा मतदारसंघात आमदार किसन कथोरेंची नाराजी दूर करत निलेश सांबरे यांना मिळू शकणारी संभाव्य आघाडी रोखण्यात भाजप यशस्वी ठरताना दिसला. भिवंडी पूर्व आणि भिवंडी पश्चिम या मुस्लीमबहुल विधानसभा मतदारसंघांमध्ये महाविकास आघाडीकडे मतदारांचा कल दिसून आला. मात्र, कपिल पाटील यांचा वैयक्तिक जनसंपर्क, महायुतीकडून करण्यात आलेले प्रभावी राजकीय व्यवस्थापन यांमुळे सुरुवातीला नाराज दिसत असलेला ग्रामीण भागातील मतदार शेवटी भाजपकडे वळताना पाहायला मिळाला. येथील आदिवासी मतदार स्वत:कडे वळवण्यात यशस्वी झालेला उमेदवार विजय प्राप्त करेल, असे चित्र आहे.

कल्याण लोकसभा मतदारसंघात शिवसेना शिंदे गटाचे डॉ. श्रीकांत शिंदे आणि शिवसेना ठाकरे गटाच्या वैशाली दरेकर यांच्यात थेट लढत झाली. येथील सहापैकी पाच विधानसभा मतदारसंघांमध्ये महायुतीचा प्रभाव असणे, विद्यामान खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांचा दांडगा जनसंपर्क आणि प्रभावी संघटन याचा फायदा येथे महायुतीला होताना दिसला. कळवा-मुंब्रा विधानसभा मतदारसंघ वगळता, संपूर्ण लोकसभा मतदारसंघात डॉ. श्रीकांत शिंदे यांच्या बाजूने मतदारांचा कल दिसून आला. आगरी, दलित आणि मुस्लीम मतदार स्वत:कडे वळवण्यात शिवसेना ठाकरे गटाला येथे किती यश मिळते, हे पाहायचे.

तर सहा लोकसभा मतदारसंघांचा समावेश असणाऱ्या मुंबईत शिवसेनेतील फुटीमुळे उद्धव ठाकरे यांना मिळत असलेली सहानुभूती पाहता, ठाकरे गटासाठी येथे एकतर्फी चित्र राहील असे वाटले होते. मात्र, महायुतीकडून स्थानिक पातळीवर करण्यात आलेले राजकीय व्यवस्थापन आणि मोदींनी केलेला आक्रमक प्रचार यामुळे अंतिमत: मुंबईतील लढती कमालीच्या चुरशीच्या झाल्या. महाविकास आघाडीकडून मुंबईतील सहापैकी चार जागांवर शिवसेना ठाकरे गटाने, तर दोन जागांवर काँग्रेसने निवडणूक लढवली. महायुतीत भाजप आणि शिवसेना शिंदे गटाने प्रत्येकी तीन जागा लढवल्या.

मुंबई दक्षिण मतदारसंघात शिवसेना ठाकरे गटाचे विद्यामान खासदार अरविंद सावंत यांच्याविरोधात दीर्घकाळ केलेल्या चर्चांनंतर अखेरीस शिवसेना शिंदे गटाने आमदार यामिनी जाधव यांना रिंगणात उतरवले. येथील वरळी आणि शिवडी या विधानसभा मतदारसंघांवर प्रभाव राखण्यात अरविंद सावंत यांना यश मिळताना दिसले. तर मलबार हिल आणि कुलाबा या विधानसभा मतदारसंघांत महायुतीमुळे भाजपचा पारंपारिक मतदार यामिनी जाधव यांच्या बाजूने उभा राहिला. यामिनी जाधव यांचा प्रभाव असलेल्या भायखळा मतदारसंघात मतदारांचा कल कोणासोबत जातो आणि मुंबादेवी विधानसभेत अरविंद सावंत निर्णायक आघाडी घेतात का, यावर या लोकसभेचा निकाल अवलंबून असेल.

मुंबई दक्षिण-मध्य लोकसभा मतदारसंघात शिवसेना शिंदे गटाचे विद्यामान खासदार राहुल शेवाळे यांच्याविरोधात शिवसेना ठाकरे गटाने अनिल देसाई यांना रिंगणात उतरवले. धारावी पुनर्वसन प्रकल्पाचा मुद्दा चर्चेचा ठरलेल्या या मतदारसंघात अनिल देसाई यांच्या तुलनेत राहुल शेवाळे यांनी प्रचारात आघाडी घेतल्याचे दिसून आले. येथील अणुशक्तीनगर या विधानसभा मतदारसंघातील मुस्लीम मतदार अनिल देसाई यांच्या बाजूने उभा राहताना दिसला. परंतु स्थानिक उमेदवार असण्याची बाब राहुल शेवाळे यांच्यासाठी अणुशक्तीनगर येथे पथ्यावर पडताना दिसली. दलित मतदारांचा कलही प्रामुख्याने राहुल शेवाळे यांच्या बाजूने पाहायला मिळाला. मात्र, धारावी येथे काँग्रेसच्या वर्षा गाकवाड यांच्या संघटनशक्तीचा फायदा अनिल देसाई यांना होताना दिसला. सायन-कोळीवाडा आणि चेंबूर येथील मराठी, उत्तर भारतीय आणि दक्षिण भारतीय मतदार कोणाकडे जातो, हे पाहणे औत्सुक्याचे असेल. माहीम विधानसभेतील मतदार आपला कल पारंपरिक ठेवतात की नवीन धारणांचा स्वीकार करतात, यामध्ये या मतदारसंघाचा निकाल दडलेला दिसून येईल.

दोन्ही शिवसेनांमध्ये थेट लढत झालेला तिसरा मतदारसंघ म्हणजे वायव्य मुंबई. या लोकसभा मतदारसंघात शिवसेना ठाकरे गटाकडून अमोल किर्तीकर यांना, तर शिवसेना शिंदे गटाकडून आमदार रवींद्र वायकर यांना उमेदवारी देण्यात आली. येथील अंधेरी पश्चिम, गोरेगाव आणि वर्सोवा या तीन विधानसभा मतदारसंघांत भाजपचे वर्चस्व असल्याचा फायदा रवींद्र वायकर यांना मिळताना दिसला. मात्र, या तिन्ही विधानसभा मतदारसंघांत निर्णायक असणाऱ्या मुस्लीम आणि मराठी मतदारांमधील सहानुभूती किर्तीकर यांच्या पथ्यावर पडताना दिसून आली. गोरेगाव आणि दिंडोशी येथील उत्तर भारतीय मतदार महायुतीमुळे वायकर यांच्या पाठीशी उभा राहताना दिसला. तसेच अंधेरी पूर्व विधानसभा मतदारसंघात भाजपचे संघटन आणि गुजराती मतदारांचे समर्थन याचा फायदा रवींद्र वायकर यांना होताना दिसला. याही मतदारसंघात मराठी मतदारांचा कल निर्णायक ठरेल.

शिवसेना ठाकरे गटाने मुंबईत चौथी जागा लढवली ती ईशान्य मुंबई मतदारसंघात. येथे भाजपचे आमदार मिहीर कोटेचा यांच्याविरोधात शिवसेना ठाकरे गटाने माजी खासदार संजय दिना पाटील यांना रिंगणात उतरवले. मुंबईत भाजपच्या विरोधात शिवसेना ठाकरे गटाने लढवलेली ही एकमेव जागा. गुजराती आणि मराठी मतदारांची संख्या निर्णायक असणाऱ्या या मतदारसंघातील निवडणुकीला मराठी विरुद्ध गुजराती असे स्वरूप आलेले होते. मतदारसंघातील मुस्लीम व दलित मतदारांचा कल संजय दिना पाटील यांच्या बाजूने दिसून आला. मानखुर्द-शिवाजीनगर विधानसभा मतदारसंघात निर्णायक आघाडी घेण्यात संजय दिना पाटील यांना यश मिळताना दिसले. परंतु शिवसेनेचा प्रभाव असलेल्या विक्रोळी आणि भांडुप या विधानसभा मतदारसंघांत मतदार कोणाच्या बाजूने जातात, हे पाहणे महत्त्वाचे राहील. सुरुवातीच्या काळात एकतर्फी झालेली येथील निवडणूक नरेंद्र मोदी यांच्या रोड शोनंतर कमालीची चुरशीची बनली. मुलुंड आणि घाटकोपर पूर्व या विधानसभा मतदारसंघांत निर्णायक आघाडी घेणाऱ्या भाजपला घाटकोपर पश्चिममधील मतदार स्वीकारतो का, यावरच या मतदारसंघाचा कौल अवलंबून असेल.

मुंबई उत्तर आणि मुंबई उत्तर-मध्य या दोन लोकसभा मतदारसंघांमध्ये भाजप विरुद्ध काँग्रेस अशी लढत झाली. मुंबई उत्तर मतदारसंघात भाजपचे पियुष गोयल यांच्याविरोधात काँग्रेसकडून भूषण पाटील यांना उमेदवारी देण्यात आली. तर मुंबई उत्तर-मध्य मतदारसंघात काँग्रेसच्या वर्षा गायकवाड यांच्याविरोधात भाजपने विधिज्ञ उज्ज्वल निकम यांना रिंगणात उतरवले. या दोन्ही मतदारसंघांमध्ये काँग्रेसचे संघटन काही प्रमाणात असले, तरी येथे काँग्रेस मात्र शिवसेना ठाकरे गटाच्या मदतीवर बरीच अवलंबून दिसली. परंतु शिवसेना ठाकरे गटाचा पारंपरिक मतदार काँग्रेसला मतदान करण्यास फारसा अनुकूल दिसून आला नाही. मुस्लीम आणि दलित मतदार येथे काँग्रेसच्या उमेदवारांकडे वळताना दिसले. मात्र, हिंदी भाषक आणि गुजराती मतदार येथे भाजपच्या बाजूने अनुकूल दिसला. तसेच येथील मराठी मतदारांवर हिंदुत्वाच्या मुद्द्यांच्या प्रभाव पाडण्यात भाजपला यश मिळताना दिसले.

शिवसेना विरुद्ध शिवसेना

ठाणे लोकसभा मतदारसंघात शिवसेना ठाकरे गटाचे विद्यामान खासदार राजन विचारे यांच्याविरोधात शिवसेना शिंदे गटाने माजी महापौर नरेश म्हस्के यांना रिंगणात उतरवले. उद्धव ठाकरे यांच्याविषयीची मतदारांमधील सहानुभूती ही राजन विचारे यांच्यासाठी, तर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा प्रभाव ही नरेश म्हस्के यांच्यासाठी जमेची बाब ठरली. सुरुवातीला महायुतीत उमेदवारीवरून झालेला संभ्रम आणि त्यामुळे उशिरा उमेदवारी मिळूनही अल्प काळात म्हस्के यांनी प्रचारात आघाडी घेतल्याचे दिसून आले. ठाणे शहर मतदारसंघातील भाजपचा पारंपरिक मतदार, कोपरी-पाचपाखाडी मतदारसंघातील मुख्यमंत्र्यांचा प्रभाव, ओवळा-माजीवडा मतदारसंघातील पक्षाचे संघटन नरेश म्हस्के यांच्यासाठी सहाय्यक ठरताना दिसले. ऐरोली आणि बेलापूरसह मीरा-भाईंदर विधानसभा मतदारसंघांत कोणाला निर्णायक आघाडी मिळते, यावर या लोकसभा मतदारसंघाचा निकाल अवलंबून असेल.

sushil@strelema.com

prasadhavale@icpld.org

Story img Loader