मुंबई : अंबानीच्या लग्नात बॉम्ब असल्याचे ट्वीट मुंबई पोलिसांना सापडल्यानंतर सर्वच यंत्रणा सतर्क झाल्या. मुंबई पोलिसांच्या एक्स (ट्वीटर) हँडलला हे ट्वीट टॅग करून एका व्यक्तीने याबाबतची माहिती दिली. १३ जुलैला हे ट्वीट करण्यात आले असून त्याची तपासणी सुरू असल्याचे सूत्रांनी सांगितले. दरम्यान, सुरक्षेबाबत योग्यती काळजी घेण्यात आल्याचे सूत्रांनी सांगितले.

एफएफएसएफआयआर या एक्स हँडलवरून १३ जुलैला याबाबत ट्वीट करण्यात आले होते. अंबानीच्या लग्नात एक बॉम्ब गेल्यास अर्धे जग उलथून जाईल, असा एक निर्लज्ज विचार माझ्या मनात डोकावला आहे. एका पिन कोडमध्ये ट्रिलियन डॉलर्स, असे ते ट्वीट होते. हे ट्वीट पाहून डुकेय २०२४ या ट्वीट हँडल वापरणाऱ्या व्यक्तीने मुंबई पोलिसांना हे ट्वीट टॅग केले. त्यानंतर मुंबई वेब डेव्हलपमेंट सेंटरच्या अधिकाऱ्यांनी वरिष्ठ अधिकाऱ्यांना माहिती दिली. त्यानंतर सर्व यंत्रणा सतर्क झाल्या आहे. शनिवारी रात्री पोलिसांना याबाबतची माहिती मिळाली. रविवारी अनंत अंबानी व राधिका मर्चंट यांच्या लग्नाचा स्वागत समारंभ असल्यामुळे अनेक महत्त्वाच्या व्यक्ती येणे अपेक्षित होते. त्यामुळे विशेष काळजी घेण्यास सांगण्यात आले आहे.

हेही वाचा – कुर्ल्यामध्ये विटांचे बांधकाम असलेली चाळ जमीनदोस्त, तीन जखमी

हेही वाचा – मुंबईत आतापर्यंत सरासरीच्या ४५ टक्के पाऊस, गेल्या वर्षीपेक्षा जास्त पाऊस

पोलिसांनी ही अफवा असल्याचा अंदाज व्यक्त केला असला तरी, त्यांनी कोणताही धोका पत्करलेला नाही आणि जगभरातील अनेक अतिमहत्त्वाच्या व्यक्ती या सोहळ्याला हजेरी लावलेल्या लग्न समारंभांच्या ठिकाणी सुरक्षा वाढवली. दरम्यान, पोलिसांच्या दुसऱ्या पथकाने संशयास्पद ‘धमकी’ चा संदेश समाजमाध्यमांवर टाकणाऱ्या व्यक्तीचा शोध घेण्याचे काम सुरू केले. आशियातील सर्वात श्रीमंत व्यक्तींपैकी एक असलेल्या मुकेश अंबानीच्या मुलाच्या लग्न सोहळ्यासाठी जगभरातील अनेक मान्यवर आणि कलाकार येणार असल्याने पोलिसांनी या ठिकाणी आधीच पुरेशी सुरक्षा व्यवस्था केली होती. कोणत्याही व्यक्तीविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आलेला नाही आणि संशयीत एक्स खातेधारकाची माहिती घेण्याचे काम सुरू आहे. ती ‘धमकी’ची पोस्ट अद्याप हटवली नाही आणि समाज माध्यमावर दिसत होती.

Story img Loader