मुंबई: गेली अनेक वर्षे धोकादायक स्थितीत उभी असलेली चुनाभट्टीमधील टाटानगर इमारत अखेर मुंबई महानगरपालिकेने जमीनदोस्त केली. मात्र या इमारतीत वास्तव्यास असलेले गिरणी कामगार आद्यपही वाऱ्यावरच आहेत. दरम्यान, सरकारने पर्यायी निवाऱ्याची व्यवस्था करावी, अशी मागणी रहिवाशांकडून करण्यात येत आहे.

चुनाभट्टीमधील स्वदेशी गिरणीमध्ये काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांसाठी १९६० मध्ये चुनाभट्टी परिसरात टाटानगर इमारत बांधण्यात आली होती. काही वर्षांपूर्वी ही गिरणी बंद झाली. त्यानंतर कंपनीने या इमारतीकडे कानाडोळा केला. परिणामी, डागडुजीअभावी इमारतीची अवस्था दयनीय झाली. इमारतीच्या छताला दिलेला सिमेंटचा गिलावा अधूनमधून कोसळत असल्याने रहिवासी जीव मुठीत धरून इमारतीमध्ये राहत होते. मात्र गेल्या तीन – चार वर्षांत इमारत जरजर झाली. त्यामुळे काही रहिवाशांनी पदरमोड करून भाड्याच्या घरात राहणे पसंत केले.

Ajit Pawar claimed area honorables deprived Kharadi Chandannagar of water for tanker business
अन्यथा मते मागायला येणार नाही, असे उपमुख्यमंत्री अजित पवार का म्हणाले !
Nana Patole On Devendra Fadnavis :
Nana Patole : निकालाआधी राजकीय घडामोडींना वेग; यातच…
uddhav thackeray emotional appeal impact to voters
उद्धव यांचे भावनिक आवाहन ठाकरे सेनेला कितपत तारणार? मराठवाड्याकडे विशेष लक्ष?
dcm devendra fadnavis in loksatta loksamvad
लोकसभेतील अपयशानंतर ‘भारत जोडो’सारख्या शक्तींवर मात; विधानसभेत प्रभाव नसल्याचे देवेंद्र फडणवीस यांचे प्रतिपादन
jharkhand assembly election 2024 amit shah attack at rahul gandhi
झारखंडमध्ये ‘राहुल विमान’ कोसळणार! केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांची टीका
congress rajya sabha mp abhishek manu singhvi at loksatta loksamvad event
आरक्षणावर सर्वोच्च न्यायालय विरुद्ध सारे राजकीय पक्ष
traffic cleared due to police planning in Pune print news
पाेलिसांच्या नियोजनामुळे वाहतूक सुरळीत-पंतप्रधानांच्या सभेसाठी कडक बंदोबस्त

हेही वाचा… आता सेंट जॉर्ज रुग्णालयातही यकृत प्रत्यारोपण शक्य

गेल्या दोन वर्षापर्यंत या इमारतीत सहा ते सात कुटुंबे वास्तव्यास होती. मात्र दीड वर्षांपूर्वी कुर्ला येथील नेहरूनगर परिसरातील एक धोकादायक इमारत कोसळल्यानंतर भर पावसात महानगरपालिकेने टाटानगर इमारत पूर्णपणे रिकामी केली. त्यानंतर काही दिवस या कुटुंबियांना महानगरपालिकेने एका शाळेत आश्रय दिला होता. मात्र काही दिवसानंतर हे नागरिक पुन्हा या इमारतीत वास्तवास आले होते. त्यानंतर काही महिन्यांपूर्वी महानगरपालिकेने पुन्हा या सर्वांची घरे रिकामी करून इमारत तोडण्यास सुरुवात केली. या इमारतीमधील बहुसंख्य रहिवासी सध्या भाड्याच्या घरात अथवा नातेवाईकांकडे वास्तव्यास आहेत. दरम्यान, सरकारने आम्हाला याच परिसरात कायमस्वरूपी घर द्यावे किंवा भाडे द्यावे, अशी मागणी या गिरणी कामगारांकडून करण्यात येत आहे.