लोकसत्ता खास प्रतिनिधी

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

मुंबईः गावदेवी येथील कारमायकल रोड परिसरात राहणाऱ्या व्यावसायिकाच्या घरातून सुमारे दोन कोटी रुपयांचे दागिने चोरी केल्याप्रकरणी गावदेवी पोलिसांनी पाच जणांना अटक केली. या प्रकरणी पावणेदोन कोटी रुपयांचे दागिने हस्तगत करण्यात गावदेवी पोलिसांना यश आले आहे.

व्यावसायिक शरदकुमार शाम सांगी कारमायकल रोड येथे राहतात. त्यांच्या घरातील लॉकरमधून महागडे घड्याळ, हिऱ्यांचा हार, हिऱ्यांची कर्णफुले, हिरेजडीत ब्रेसलेट, सोन्याचा हार, सोनसाखळी व कर्णफुले तसेच काळ्या-पांढऱ्या रंगाच्या हिऱ्यांचा हार असे सुमारे एक कोटी ९८ लाख रुपये किंमतीचे दागिने गायब झाल्याचे सांगी यांच्या निदर्शनास आले. सांगी यांनी या प्रकरणी केलेल्या तक्रारीवरून गावदेवी पोलिसांनी मोलकरीण मायलेन सुरेन (३७) विरोधात भादंवि कलम ३८१ अंतर्गत चोरीचा गुन्हा दाखल केला होता. तक्रारीमध्ये २२ मार्च ते १४ एप्रिलदरम्यान चोरी झाल्याचे म्हटले आहे.

हेही वाचा… मुंबई : राज्यातील वैद्यकीय महाविद्यालयांची जागा अधिष्ठात्यांच्या नावे होणार

लॉकरमधून एकूण आठ महागडे दागिने चोरीला गेले आहेत. प्रत्येक दागिना सुमारे २० लाख ते ६० लाख रुपये किंमतीचा आहे. लॉकरमध्ये दागिने ठेवण्यात आल्याची माहिती मायलेनला होती. या माहितीच्या आधारे पोलिसांनी मायलेनला अटक केली. या चोरीमध्ये मायलेनबरोबर अब्दुल मुनाफचाही सहभाग असल्याचे उघड झाले. अब्दुले राज्याबाहेर पळण्याच्या तयारीत असताना पोलिसांनी त्याला जोगेश्वरी रेल्वे स्थानकावरून अटक केली, अशी माहिती संबंधित पोलीस अधिकाऱ्याने दिली.

हेही वाचा… मुंबई : सीमाशुल्कापोटी सात कोटी रुपये बुडवणाऱ्या व्यावसायिकाला अटक

सोन्याची विक्री करणाऱ्या दलालांना आरोपींनी चोरलेले दागिने दिल्याचे चौकशीत उघड झाले. या माहितीच्या आधारावर गावदेवी पोलिसांनी ताडदेव येथील हसमुख बगडा, परळ येथून नसरुद्दीन शेख तसेच संगिता कांबळे यांना अटक केली. त्यांच्याकडून एक कोटी ७१ लाख रुपये किंमतीचे दागिने हस्तगत करण्यात पोलिसांना आले.

Mumbai News (मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: The theft of jewellery worth two crores from a businessmans house five people arrested including maid seized jewellery worth two crores in mumbai mumbai print news dvr
Show comments