मुंबई: अंधेरी न्यायालयाच्या आवारातील उपहारगृहातून सहा मोबाइल चोरल्याप्रकरणी एका आरोपीला अंधेरी पोलिसांनी अटक केली. सोहेब शेख असे या आरोपीचे नाव असून त्याने चोरलेले मोबाइल लवकरच  हस्तगत करण्यात येतील, असे पोलिसांनी सांगितले.पण हा संपूर्ण प्रकार सीसी टीव्ही कॅमेऱ्यात कैद झाला आहे. त्यामुळे काही तासांतच पोलिसांनी आरोपीला पकडले.

हेही वाचा >>> मुंबईः क्रिप्टो करन्सीमध्ये गुंतवणुकीचे आमिष दाखवून तरुणीची फसवणूक

Nine year old girl killed three injured as water tank collapses in Mumbai Nagpada
नागपाड्यात पाण्याची टाकी फुटली; दुर्घटनेत चिमुकलीचा मृत्यू, तीनजण जखमी
Bangladeshi infiltrators , ATS,
एटीएसकडून १७ बांगलादेशी घुसखोरांना अटक
BEST Bus accident, BEST Bus , general manager BEST Bus, BEST Bus news
बेस्ट बस अपघात : अहवाल येण्यापूर्वीच महाव्यवस्थापकांची बदली, कंत्राटदारावरही कारवाई नाही
Borivali air, Air pollution Mumbai, Air pollution Borivali,
बोरिवलीची हवा ‘अतिवाईट’, मुंबईत हवा प्रदूषणाचे सत्र सुरूच
Rani Bagh, Christmas tourists Rani Bagh,
नाताळच्या सुट्टीनिमित्त राणीच्या बागेत पर्यटकांची वर्दळ, महानगरपालिकेच्या तिजोरीत ३ लाखांचा महसूल जमा
vote jihad , BJP, Rais Shaikh , Samajwadi Party,
भाजपचा ‘व्होट जिहाद’चा आरोप निराधार : सप
Shivsena supports best kamgar sena , best kamgar sena , best kamgar sena protest ,
महापालिका प्रशासनाविरोधातील आंदोलनाला ‘मातोश्री’वरून पाठबळ; सर्व आमदार, खासदारांना आंदोलनात सहभागी होण्याचे आदेश
Adani group, dharavi, Adani group dharavi banner,
नवे सरकार सत्तेवर येताच अदानी समुहाकडून धारावीत जोरदार फलकबाजी, बहुभाषिक धारावीत गुजराती फलकांचाही समावेश
Christmas in Mumbai, Christmas joy Mumbai,
मुंबईत ‘नाताळ’चा उत्साह, रोषणाईचा झगमगाट आणि आनंदाची उधळण
थेट न्यायालयाच्या आवारातूनच सहा मोबाइलची चोरी; सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाला प्रकार

अंधेरी न्यायालयाच्या आवारात एक उपहारगृह असून रवी पुजारी या उपहारगृहाचे चालक आहेत. त्यांचे कर्मचारी दिवसा उपहारगृहात काम करून रात्री उशिरा तेथेच झोपतात. त्यांच्या उपहारगृहात २५ नोव्हेंबर रोजी रात्री उशिरा एक तरुण घुसला होता. त्याने झोपलेल्या कर्मचाऱ्यांचे सहा मोबाइल घेऊन पलायन केले. दुसऱ्या दिवशी हा प्रकार उघडकीस येताच त्यांनी अंधेरी पोलिसांत तक्रार केली. या तक्रारीनंतर दोन दिवसांनी अंधेरी पोलिसांनी मोबाइल चोरीचा गुन्हा नोंदविला होता. हा संपूर्ण प्रकार सीसी टीव्ही कॅमेऱ्यामध्ये कैद झाला होता. त्यामुळे आरोपीची ओळख पटवून पोलिसांनी मंगळवारी त्याला अंधेरी येथून अटक केली. सोहेब असे या आरोपीचे नाव असून तो सराईत गुन्हेगार आहे. त्याच्याविरुद्ध विविध गंभीर गुन्ह्यांची नोंद असून त्याला यापूर्वीही अंधेरी पोलिसांनी अटक केली होती. त्याने मोबाइल चोरीची कबुली दिली आहे. त्यापैकी काही मोबाइल त्याने विकले आहेत. लवकरच हे मोबाइल संबंधितांकडून हस्तगत करण्यात येतील, असे पोलिसांनी सांगितले.

Story img Loader