मुंबई : कुलाबा-वांद्रे-सीप्झ मेट्रो ३ मार्गिकेसाठीची तिसरी मेट्रो गाडी लवकरच मुंबईत दाखल होणार आहे. महत्त्वाचे म्हणजे ही गाडी थेट आरे कारशेडमध्ये आणण्यात येणार आहे. यापुढील सर्व गाड्या आता आरे कारशेडमध्येच दाखल होणार आहेत.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
सर्व प्रीमियम कंटेंट, ई-पेपर व अर्काइव्हमधील सगळे लेख वाचण्यासाठी

मेट्रो ३ चा आरे – बीकेसी टप्पा डिसेंबर २०२३ मध्ये कार्यान्वित करण्यात येणार आहे. त्यानुसार मुंबई मेट्रो रेल कॉर्पोशनने (एमएमआरसी)कामाला वेग दिला आहे. मेट्रो सेवेत दाखल करण्यासाठी कारशेड पूर्ण होणे आवश्यक आहे. त्यामुळे आता एमएमआरसीने कारशेडच्या कामाला वेग दिला आहे. या कारशेडमध्ये ३१ मेट्रो गाड्या ठेवण्याची आणि त्यांच्या देखभाल-दुरुस्तीची व्यवस्था असणार आहे. एमएमआरसीच्या व्यवस्थापकीय संचालिका आश्विनी भिडे यांनी नुकतीच आरे कारशेडची पाहणी केली. कारशेडचे काम डिसेंबरपर्यंत पूर्ण करण्याचे एमएमआरसीचे नियोजन आहे.

हेही वाचा… मुंबईः निष्कासन कारवाईदरम्यान महानगरपालिका अधिकाऱ्याला मारहाण

हेही वाचा… राज्यात अवघे ५६ हजार युनिट रक्त, शिबिरांचे आयोजन करण्याचे आवाहन

एमएमआरसीने आंध्र प्रदेशातील एका कंपनीला ३१ गाड्यांच्या बांधणीचे कंत्राट दिले आहे. पण पहिल्या टप्प्यासाठी केवळ ९ गाड्या आवश्यक आहेत. त्यामुळे आंध्र प्रदेशातील श्रीसिटी येथे प्राधान्य क्रमाने नऊ गाड्यांची बांधणी केली जात आहे. यातील दोन गाड्या पूर्ण होऊन मुंबईत दाखल झाल्या आहेत. सारीपूत नगर येथील तात्पुरत्या कारशेडमध्ये या गाड्या ठेवण्यात आल्या असून येथे त्यांची नियमित चाचणी घेतली जात आहे. तर आता लवकरच तिसरी गाडी मुंबईत दाखल होणार आहे. ही गाडी थेट आरे कारशेडमध्ये आणण्यात येणार आहे. त्यामुळे कारशेडमधील गाड्या ठेवण्याच्या आणि गाड्यांची चाचण्या घेण्याच्या सुविधेच्या कामाचा आढावा भिडे यांनी घेतला. लवकरच तिसरी गाडी आरे कारशेडमध्ये दाखल होईल, असेही त्यांनी यावेळी सांगितले.